Assam Cop Suspended Consuming Alcohol On Duty Dainik Gomantak
देश

Viral Video: ड्युटीवर असताना दारु पिणं पोलिसाला पडलं महागात, डीजीपींनी दिले निलंबनाचे आदेश

Assam Cop: ड्युटीवर असताना दारु पित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

Assam Cop Suspended Consuming Alcohol On Duty: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना दारु पित असताना दिसत आहे. हा पोलिस कर्मचारी आसाम पोलिसमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मे महिन्यात असे वक्तव्य केले होते की, आसाम पोलिसांमध्ये सुमारे 300 अधिकारी आहेत जे नियमितपणे दारु पितात अशा लोकांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) दिली जाईल.'

यातच, ड्युटीवर असताना दारु पित असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मद्यधुंद अवस्थेत आढळणे अजिबात सहन केले जाणार नाही

दरम्यान, डीजीपी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी X वर एका पोस्ट करत संबंधित पोलिस (Police) कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. गुवाहाटीमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा मद्यपान करतानाचा व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे.

ड्युटीवर असताना किंवा गणवेशात, ड्युटी नसतानाही दारुच्या नशेत आढळलेल्या पोलीस कर्मचार्‍यांसाठी आमच्याकडे झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. मी कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.

सर्वात कठोर शिक्षा दिली जाईल

दुसरीकडे, सोमवारी संध्याकाळी एका आदेशाची प्रत सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत त्यांनी सांगितले की, पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

आदेशानुसार, निलंबित पोलिस अधिकाऱ्याचे नाव ओम प्रकाश सिंह असे आहे, जे गुवाहाटीमधील फतासिल अंबारी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत.

सोमवारी पश्चिम गुवाहाटी पोलिस उपायुक्तांनी अनुशासनात्मक कारवाईचे कारण म्हणून गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा उल्लेख करत निलंबनाचा आदेश जारी केला. डीसीपीने आपल्या आदेशात लिहिले की, फतासिल अंबारी पीएसचे UBC/1218 ओम प्रकाश सिंह यांना गैरवर्तन आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT