Team India  Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Team India Record: टीम इंडियाने यूएईच्या भूमीवर दोन टी20 स्पर्धा खेळल्या आहेत. टी20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाने येथे 5 सामने खेळले होते.

Manish Jadhav

Team India Record: आशिया कप 2025 ची तयारी सर्व संघांनी आता जोरात सुरु केली आहे. इतर संघ टी20 मालिका खेळून स्पर्धेत उतरणार आहेत, तर टीम इंडिया जवळपास 6 महिन्यांनंतर टी20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया सध्या आशिया कपची विजेती आहे, त्यामुळे 9 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया आपले विजेतेपद अबाधित राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, यूएईच्या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे? विशेषतः पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची कामगिरी यूएईमध्ये काही खास नाही.

यूएईमध्ये टीम इंडियाचा कसा आहे विक्रम?

दरम्यान, टीम इंडियाने (Team India) यूएईच्या भूमीवर दोन टी20 स्पर्धा खेळल्या आहेत. टी20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाने येथे 5 सामने खेळले होते. त्यापैकी 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता, तर 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. हे दोन्ही पराभव पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झाले होते. या स्पर्धेत टीम इंडियाला बाद फेरीपर्यंतही पोहोचता आले नव्हते.

त्यानंतर, 2022 मध्ये आशिया कप टी20 खेळण्यासाठी टीम इंडियाी पुन्हा यूएईमध्ये पोहोचली. येथेही भारताने 5 सामने खेळले, पण मागील विश्वचषकासारखीच परिस्थिती पुन्हा दिसून आली. या वेळीही भारताला (India) पाकिस्तानने हरवले आणि दुसरा पराभव श्रीलंकेसारख्या तुलनेने कमजोर संघाकडून झाला होता. या दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडिया बाद फेरीही गाठू शकला नाही, ही मोठी निराशाजनक बाब होती.

पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा विक्रम

टी20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाने यूएईच्या भूमीवर पाकिस्तानविरुद्ध एकूण 3 सामने खेळले आहेत. यातील 2 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. आता पुन्हा एकदा टीम इंडिया 14 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून विक्रमाची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

गेल्या काही वर्षांतील पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि यूएईतील आपला खराब विक्रम सुधारण्यासाठी टीम इंडियाकडे ही एक मोठी संधी आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात असून त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा यूएईच्या मैदानावरची खराब कामगिरी असू शकतो.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाची कसोटी

सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी चांगली आहे, पण यूएईच्या मैदानात खेळण्याचा अनुभव फार कमी खेळाडूंना आहे. त्यामुळे, संघाला जुन्या चुका टाळत एक नवीन सुरुवात करावी लागेल. तर दुसरीकडे, इतर संघ टी20 मालिका खेळून तयारी करत आहेत, मात्र टीम इंडियाला थेट स्पर्धेतच आपली लय शोधावी लागणार आहे. या स्पर्धेतील कामगिरी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. केवळ विजेतेपदच नाही, तर यूएईमधील मागील अपयशाची कटू आठवण पुसून टाकणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

SCROLL FOR NEXT