आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना हा नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी मानला जातो. मात्र यंदा या सामन्याभोवती तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आज (१४ सप्टेंबर) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत असतानाच दुबईतील भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्काराची मागणी जोर धरत आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे क्रिकेटपेक्षा राजकारणाचा रंग या सामन्यावर चढला आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी होत होती. सामन्याच्या पूर्वसंध्येला या मागण्यांनी उग्र रूप धारण केले आहे.
भारतीय संघाने जर पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर आशिया कपमधील तो सामना ‘फॉरफिट’ मानला जाईल. या परिस्थितीत गुण पाकिस्तानला मिळतील आणि भारताच्या गुणतालिकेवर थेट परिणाम होईल.
ग्रुप टप्पा: भारत सध्या ग्रुप A मध्ये अव्वल स्थानी आहे. परंतु सामना न खेळल्यास पाकिस्तानला मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे ते भारताला मागे टाकतील.
सुपर-४ फेरी: पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर पाकिस्तानला भारतावर वरचष्मा मिळेल.
अंतिम फेरी: जर अंतिम फेरीत दोन्ही संघ पोहोचले आणि भारताने पुन्हा बहिष्कार टाकला, तर पाकिस्तानला विजेता घोषित करण्यात येईल.
काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) स्पर्धेत माजी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध गट टप्प्यात आणि उपांत्य फेरीत खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तान चॅम्पियन्सला वॉकओव्हर मिळाला आणि ते थेट अंतिम फेरीत पोहोचले. आता इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, "हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. खेळाडूंना चाहत्यांच्या भावना आणि भावना समजतात. संघाच्या बैठकींमध्ये आम्ही या विषयावर चर्चा केली आहे. मात्र आमचं लक्ष केवळ खेळावरच आहे."
भारत: पहिल्या सामन्यात यजमान यूएईचा ९ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. फक्त ४.३ षटकांत ५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
पाकिस्तान: पहिल्या सामन्यात ओमानवर ९३ धावांचा विजय मिळवून गटातील ताकद सिद्ध केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.