
पेडणे: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात महामार्गावर टोल आकारला जाणार नाही, असे आश्वासन यापूर्वी दिले आहे, असे असले तरी आता गोव्याच्या हद्दीत पत्रादेवी येथे टोल आकारणीसाठी बांधकामास सुरुवात करण्यात आल्याने भविष्यात टोल आकारणी होईल यांचे संकेत मिळू लागले आहेत.
पत्रादेवी सिमेपासून महाराष्ट्राच्या हद्दीत बांदा येथे ३०० मीटरवर टोल आकारणी करण्यासाठी इमारत पूर्ण सोयीनिशी बांधल्यास चार वर्षे झाली आहेत. अद्याप तिथे ती कार्यान्वित करण्यात आलेली नाही. ती दुर्लक्षित सुविधा पासून टोल आकारणी होणार नाही, असेच सर्वांना वाटत होते. मात्र अचानकपणे पत्रादेवी येथे गोव्याच्या हद्दीत नव्याने टोल प्लाझाचे बांधकाम सुरू झाल्याने टोल आकारणी दृष्टिपथात आल्याचे मानले जात आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे तोरसे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर टोल प्लाझा बांधकामासाठी अधिसूचना काढून भूसंपादन करून जागा घेण्यात आली असून त्यासाठीचे बांधकामही सुरू झालेले आहे. भूसंपादनासाठी जानेवारी २०२५ मध्ये यासाठी कुणाच्या हरकती असतील, तर त्या मागवण्यात आल्या होत्या.
सक्षम अधिकाऱ्यांनी त्यावर विचार विनिमय करून त्या अमान्य केल्या व त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता. सक्षम अधिकारीणीचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर सक्षम अधिकारणीचा अहवाल स्वीकारण्यात आल्यानंतर आणि सदर कायद्याच्या कलम ३ ‘ड’च्या उप कलम १ खाली मिळालेल्या अधिकारांचा वापर करून भूसंपादन करण्यात आले. अधिकृत राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सदर परिशिष्टात उल्लेखित जमीन पूर्णपणे केंद्र सरकारच्या ताब्यात राहील, असे अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्गाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्गावर ६० किलोमीटर अंतराच्या आत टोल असू शकत नाही, याचा विचार करून तसेच स्थानिकांची एक दुसरीकडे वाहतूक असते. यामुळे असा तर सुरू केल्यास त्याचा फटका गोवा राज्यातील व सिंधुदुर्गमधील वाहनधारकांना बसू शकतो.
टोल प्लाझासाठी एकूण जमीन ताब्यात घेण्यात आली असून त्यासाठीचे बांधकाम सुरू आहे. तसेच बांधण्यात येणाऱ्या या टोल प्लाझा द्वारे वाहनाकडून टोल घेण्यात येणार आहे की नाही, यासंबंधीही अजून निश्चित निर्णय झालेला नसल्याचे समजते. टोल आकारण्यास सुरुवात झाल्यास गोवा व सिंधुदुर्गमधील वाहनधारकाचा त्याला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.