Kejriwal On Currency Note Dainik Gomantak
देश

Kejriwal On Currency Note: नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो छापा; केजरीवालांची मागणी, गांधींच्या फोटोविषयी म्हणाले...

अर्थव्यवस्था सुधारेल असा दावा; इंडोनेशियात २० हजारच्या नोटेवर गणपतीचा फोटो

गोमन्तक डिजिटल टीम

Kejriwal On Currency Note: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर श्री लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापावेत, अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे.

केजरीवाल म्हणाले की, दिवाळीत लक्ष्मीपुजनावेळी माझ्या मनात या भावना आल्या. त्यामुळे त्या भावना तत्काळ १३६ कोटी देशवासी आणि सरकारपर्यंत पोहचवत आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत चालली आहे. आपण आजही विकसनशील आहोत. गरीब आहोत. आपल्या सर्वांनाच वाटते की, भारत श्रीमंत व्हावा. प्रत्येक भारतवासी श्रीमंत झाला पाहिजे. त्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. शाळा, रूग्णालये, पायाभूत सुविधांची गरज आहे. प्रयत्न करत आहोत, पण त्याचे परिणाम दिसत नाहीत. देवदेवतांचा आशिर्वाद लाभला तर सकारात्मक परिणाम दिसतील.

केजरीवाल म्हणाले की, दिवाळीत सर्वांनीच लक्ष्मी, गणेश पुजन केले असेल. उद्योगपती तर कार्यालयातच लक्ष्मी, गणेशाची मुर्ती ठेवतात. त्यामुळे माझे सरकारला आवाहन आहे की, भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा छापावा. नोटांवरील महात्मा गांधीजींचा फोटो तसाच राहू द्यावा. पण दुसऱ्या बाजूला या देवतांचे फोटो छापावेत. जेणेकरून अर्थव्यवस्थेला या देवतांचा आशिर्वाद मिळेल.

केजरीवाल म्हणाले, गणपती विघ्नहर्ता आहे. त्याचा आशिर्वाद मिळाला तर अर्थव्यवस्था सुधारेल. जुन्या नोटा आहे तशाच राहाव्यता, नव्या छापल्या जाणाऱ्या नोटांवर लक्ष्मी, गणेशाचे फोटो लावावेत. इंडोनेशियात २० हजार रूपयांच्या नोटांवर गणपतीचा फोटो आहे. मग भारतात असे का घडू शकत नाही? असा सवालही त्यांनी केला.

भाजपचा पलटवार

केजरीवालांच्या या मागणीवर भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, केजरीवाल हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी राम मंदिरात जाण्यास नकार दिला होता. आणि त्याचे कारण सांगताना ते म्हणाले होते की, देव तिथे केलेली प्रार्थना स्विकारणार नाही. याच माणसाने काश्मिरी पंडितांचे विस्थापन हे खोटे असल्याचे सांगत खिल्ली उडवली होती. त्यामुळे त्यांच्या मागणीला महत्व देण्चाची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT