Arvind Kejriwal  Dainik Gomantak
देश

Gujarat Election 2022: केजरीवाल की गॅरंटी, प्रत्येक तरुणांना मिळणार रोजगार

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये 'आप'चे सरकार आल्यास दरवर्षी 15 लाख लोकांना नोकऱ्या देऊ, अशी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये 'आप'चे सरकार आल्यास दरवर्षी 15 लाख लोकांना नोकऱ्या देऊ, अशी घोषणा केली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पक्ष सध्या व्यस्त आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. भावनगरच्या मेळाव्यात अरविंद केजरीवाल यांनी नोकरीसंदर्भातील भरती दिनदर्शिकेचे वाचन केले. डिसेंबरमध्ये सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. फेब्रुवारीमध्ये निकाल आल्यानंतर आप सरकार स्थापन करेल.

दावा: गुजरातमध्ये महा-व्यापम, म्हणाले- पेपर लीकविरोधात कायदा आणू

सीएम केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये (Gujarat) महा-व्यापमचे प्रकरण आहे. पेपरफुटीविरोधात कायदा आणू. जे पेपरफुटी थांबवू शकत नाहीत ते सरकार कसे चालवणार. 5 वर्षांपासून तलाटीचा पेपर झालेला नाही. डिसेंबरमध्ये आमचे सरकार स्थापन होईल, फेब्रुवारीत पेपर काढू. गुजरातमध्ये जेवढे पेपर फुटतात तेवढे फटाके दिवाळीत फोडत नाहीत. एप्रिलपर्यंत निकाल जाहीर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT