Doctor Dainik Gomantak
देश

Medical Colleges: दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांवर टांगती तलवार, मान्यता होऊ शकते रद्द; जाणून घ्या नेमकं कारण

NDTV च्या रिपोर्टनुसार, आधीच 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची मान्यता गमावली आहे. आता विहित नियमांचे पालन करत असल्याचे त्यांना एनएमसीला दाखवावे लागेल.

Manish Jadhav

Medical Colleges: देशातील सुमारे 150 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द होण्याचा धोका आहे. अपुरे प्राध्यापक आणि नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता संपुष्टात येऊ शकते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) ही देशातील वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी नियामक संस्था आहे.

NDTV च्या रिपोर्टनुसार, आधीच 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची मान्यता गमावली आहे. आता विहित नियमांचे पालन करत असल्याचे त्यांना एनएमसीला दाखवावे लागेल.

दरम्यान, एनएमसीच्या रडारावर आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुजरात, आसाम, पुडुचेरी, तामिळनाडू, पंजाब (Punjab), आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील महाविद्यालयांचा समावेश आहे.

आयोगाच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाकडून एक महिन्याहून अधिक काळ ही तपासणी करण्यात आली. यादरम्यान अनेक प्रकारच्या उणिवा समोर आल्या, ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आधार लिंक बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया आणि फॅकल्टी रोलमध्ये त्रुटी आढळल्या.

विहित निकषांचे पालन केले जात नव्हते

वैद्यकीय महाविद्यालये विहित निकषांचे पालन करत नसल्याचे आणि कॅमेरे बसवण्याचे काम करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक ठिकाणी बायोमेट्रिक सुविधा नीट काम करत नव्हती. तपासणीदरम्यान प्राध्यापकांची अनेक पदेही रिक्त आढळून आली.

वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical Colleges) अपील करण्याचा पर्याय असेल, असे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात एनएमसीत 30 दिवसांत पहिले अपील करता येईल. येथून अपील फेटाळल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT