Army Chief Upendra Dwivedi Dainik Gomantak
देश

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Army Chief Upendra Dwivedi: भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईबाबत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला.

Manish Jadhav

Army Chief Upendra Dwivedi On Operation Sindoor: भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईबाबत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. या ऑपरेशनदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश इंटरसेप्ट केला होता, ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिक आपल्या साथीदारांना ‘पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा!’ असा संदेश देत होते. यावरुन भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये किती घबराट पसरली होती, हे स्पष्ट होते.

जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, “जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु होते, तेव्हा आम्ही पाकिस्तानचा एक मेसेज इंटरसेप्ट केला होता, त्या मेसेजमध्ये 'पोस्ट छोडो मुजफ्फराबाद भागो' (पोस्ट सोडा आणि मुजफ्फराबादला पळा) असे म्हटले होते. आमचे हे ऑपरेशन 16 मे पर्यंत सुरु राहिले आणि विशेष म्हणजे आम्ही ते पूर्ण सतर्कतेने राबवले.” दरम्यान, या कारवाईत नेमके काय झाले, यााबबत सविस्तररित्या त्यांनी सांगितले नाही. पण पाकिस्तानी सैनिकांना जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर

भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे 6-7 मे 2025 च्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (PoK) येथील दहशतवादी ठिकाणे नष्ट करण्यासाठी सुरु केलेले एक मोठे लष्करी अभियान होते. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल भारताने हे ऑपरेशन राबवले. पहलगाम येथील हल्ल्यात 26 नागरिक, ज्यातील बहुतांश हिंदू पर्यटक होते, त्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका संघटनेने घेतली होती.

भारतीय लष्कराच्या या कारवाईने दहशतवादी संघटनांना स्पष्ट संदेश दिला की, भारत आपल्या नागरिकांवरील हल्ले सहन करणार नाही आणि अशा हल्ल्यांना थेट त्यांच्या हद्दीत घुसून प्रत्युत्तर दिले जाईल.

पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात खुलासा

दरम्यान, हा महत्त्वपूर्ण खुलासा जनरल द्विवेदी यांनी शुक्रवारी (5 सप्टेंबर) दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केला. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी लिहिलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक इनसाइड पाकिस्तान’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, हे पुस्तक केवळ एका लष्करी अभियानाची गाथा नाही, तर भारतीय लष्कर आणि संपूर्ण राष्ट्राच्या शौर्याची आणि धैर्याची कहाणी आहे.

यावेळी लष्करप्रमुखांनी जीएसटीमध्ये (GST) झालेल्या बदलांबद्दलही सरकारचे आभार मानले. ते म्हणाले की, “जीएसटीमध्ये झालेल्या बदलांमुळे आमच्या ‘आत्मनिर्भर’ अभियानाला बळ मिळेल. संशोधन आणि विकास (R&D) मध्ये आम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे. सिमुलेटरवर शून्य टक्के जीएसटी असल्याने आम्ही अधिक खरेदी करु शकू, ज्यामुळे आमचे प्रशिक्षण आणखी चांगले होईल.”

जनरल द्विवेदी यांनी पुढे सांगितले की, "आधुनिक काळात लष्कराला सतत अद्ययावत ठेवणे गरजेचे बनले आहे. या बदलांमुळे अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरणात आम्हालाच फायदा होईल. ड्रोन आणि काउंटर ड्रोन सिस्टीममध्येही यामुळे मदत मिळेल."

एकूणच, लष्करप्रमुखांच्या या भाषणातून भारतीय लष्कराची सतर्कता, क्षमता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांची झलक मिळाली. नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न वाढत असले, तरी भारतीय सेना पूर्णपणे सतर्क असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT