Army Chief Manoj Pandey Air Chief Vivek Ram Chaudhary and Naval Chief R Hari Kumar  ANI
देश

तीन बॅचमेट्सच्या हाती देशाच्या लष्कराची कमान, NDAच्या अभ्यासक्रमात होते सोबत

भारताचे लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुख होते ट्रेनिंगमध्ये मित्र

दैनिक गोमन्तक

जनरल मनोज पांडे (Army Chief Manoj Pandey) यांनी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे. रविवारी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यानंतर साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी हवाई दल आणि नौदल प्रमुखही उपस्थित होते. विशेष म्हणजे आता भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे नेतृत्व एकाच बॅचचे तीन अधिकारी करत आहेत. लष्करप्रमुख मनोज पांडे, वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार 61व्या एनडीए अभ्यासक्रमात एकत्र होते. यापूर्वी जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख (निवृत्त) राकेश कुमार सिंह भदौरिया आणि अॅडमिरल (निवृत्त) करमबीर सिंग हे देखील बॅचमेट होते, ज्यांनी एकत्रितपणे तिन्ही सेवांचा कार्यभार स्वीकारला होता. (Army Chief Manoj Pandey Air Chief Vivek Ram Chaudhary and Naval Chief R Hari Kumar)

पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लष्करप्रमुख काय म्हणाले?

जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या निवृत्तीनंतर लष्कराची कमान हाती घेतलेले जनरल मनोज पांडे यांनी रविवारी सांगितले की, लष्कर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. राष्ट्र उभारणीत लष्कराचा मोठा वाटा आहे. जगाचे भूराजकीय चित्र झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे तिन्ही सेना भारतासाठी एकत्र काम करतील. आजच्या परिस्थितीसाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहावे लागेल, असे जनरल नरवणे म्हणाले.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, लष्कराने देशाची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी भरपूर काम केले आहे. आमचे प्राधान्य ऑपरेशनल सज्जतेवर असेल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. आपापसातील शक्तींचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT