Apple AI Features
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सेवा भारतात लाँच करणार असल्याची घोषणा केलीय. एप्रिलमध्ये हे फीचर भारतात लॉंच होणार आहे.
अॅपलचं हे नवीन फीचर पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल २०२५ पासून आयफोनवर उपलब्ध होईल. ही सेवा इंग्रजी भाषेत रोलआउट केली जाणार असून नंतर ती हळूहळू इतर भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे फीचर खासकरून iPhone 16 सिरीज, iPhone 16 Pro आणि iPhone 15 Pro मॉडेल्सवर उपलब्ध होईल
सीईओ टिम कुक म्हणाले की, अॅपल इंटेलिजन्सवर खूप मेहनत घेतली जात आहे. एप्रिलमध्ये अॅपल इंटेलिजन्समध्ये अधिक भाषेंचा सपोर्ट जोडणार आहोत. त्यात फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन, जपान कोरिया आणि चिनी भाषा देखील आहेत. यासोबतच, भारत आणि सिंगापूरमधील स्थानिक इंग्रजी भाषेत उपलब्ध होणार.
अॅपल इंटेलिजन्सवैशिष्ट्यं वापरकर्त्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. Apple Intelligence इतर मोबाइल AI प्लॅटफॉर्मपेक्षा बरेच वेगळं असेल. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि वाय सुरक्षा लक्षात घेऊन, काही वैशिष्ट्ये डिव्हाइसवर कार्य करतील.
ऍपल इंटेलिजन्ससह iPhone मध्ये अनेक नवीन आणि प्रगत फीचर्स मिळतील. यापैकी काही प्रमुख फीचर्समध्ये स्मार्ट रिप्लाय, AI पॉवर्ड रायटिंग टूल्स, नोटिफिकेशन समराइज आणि इमेज एडिटिंग यांचा समावेश असणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.