Sameer Amunekar
Peel P50 ही जगातील सर्वात लहान कार आहे. जी ब्रिटनच्या पील इंजिनिअरिंग कंपनीनं बनवली आहे.
ही कार लहान आकारामुळं आणि अनोख्या डिझाइनमुळं जगभर प्रसिद्ध आहे.
Peel P50 कार इतकी छोटी आहे की, ही कार घरातही सहज पार्क करता येते.
ही कार पील इंजिनिअरिंग कंपनीनं १९६२ ते १९६५ दरम्यान बनवली होती. २०१० मध्ये या कारची आधुनिक आवृत्ती देखील लाँच करण्यात आली होती.
कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, कारची लांबी ५४ इंच (१३७ सेमी), रुंदी ३९ इंच (९९ सेमी), उंची ३९.४ इंच (१०० सेमी) आणि वजन फक्त ५९ किलो आहे.
कारची बसण्याची क्षमता फक्त एक व्यक्ती आहे. गाडीला फक्त एकच दरवाजा आणि तीन चाके आहेत. या कारचा कमाल वेग ६० किमी/तास आहे.