Annie Besant  Dainik Gomantak
देश

Annie Besant Death Anniversary: ज्यांना देश 'बसंत मां'; तर महात्मा गांधी 'बसंत देवी' म्हणत

जेव्हा गुलाम भारत ब्रिटिश काळात (British period) राजकीयदृष्ट्या झोपला होता, तेव्हा त्यांनी भारताला राजकिय, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या जागृत करण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक

भारताला (India) स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना आपण त्या त्या प्रसंगानुसार नमन करत असतो. मात्र आज आपण अशा विदेशी समाजसुधारक महिलेच्या कार्याचा कार्यभाग जाणून घेणार आहोत, जिने भारताच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका साकारली. त्यांचा जन्म लंडनमध्ये (London) झाला मात्र त्यांच्या समाजसुधारणेचे कार्यक्षेत्र भारत बनले. असे म्हटले जाऊ शकते की, जेव्हा गुलाम भारत ब्रिटिश काळात राजकीयदृष्ट्या झोपला होता, तेव्हा त्यांनी भारताला राजकिय, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या जागृत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या समाजसुधारक महिलेचे नाव अॅनी बेझंट होते. भारतातील त्यांच्या कार्यामुळे लोक त्यांना प्रेमाने आई वसंत म्हणू लागले, तर महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) त्यांना 'वसंत देवी' ही पदवी दिली. त्या पुढे काँग्रेसच्या अध्यक्षाही बनल्या.

20 सप्टेंबर 1933 रोजी चेन्नईजवळील (Chennai) अड्यार येथे त्यांचे निधन झाले, तेव्हापर्यंत भारतातील ब्रिटिशांविरोधातील राजकीय प्रबोधनासंबंधी जोरदार मोहिम राबविली. स्वातंत्र्यलढ्याने ब्रिटिश राजांच्या संवेदनांना तिलांजली देण्यास त्यांनी सुरुवात केली होती. हे ऐकून विचित्र वाटते की, एका इंग्रज महिलेने ब्रिटिश राज्याविरुद्ध भारताला गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी सुरुवातीला योगदान दिले. अॅनी बेझंट यांचा जन्म 01 ऑक्टोबर 1847 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांना भारत भूमीबद्दल प्रचंड आपुलकी होती. ज्या प्रकारे त्यांनी ब्रिटिश राजवटीत अनेक वेळा निषेधाचा आवाज उठवला, त्यातून तिला 'आयर्न लेडी' (Iron Lady) ची उपमाही मिळाली होती. त्या भारतीय तत्त्वज्ञान (Indian philosophy) आणि हिंदू धर्माने खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी भारताला आपल्या समाजसुधारणेचे कार्यक्षेत्र बनवले. त्या नेहमी म्हणायाच्या की, वेद आणि उपनिषदांचा धर्म हाच खरा मार्ग आहे.

मानवतेशी जोडण्याचा संकल्प

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे बालपण गरीबीत गेले. त्या अद्भूत प्रतिभेने समृद्ध होत्या. त्या अनेक भाषांमध्ये प्रभुध्द होत्या. 1867 मध्ये, अॅनी बेझंट यांचे वयाच्या 22 व्या वर्षी चर्चचे पादरी रेवरेंड फ्रँक बेझंट (Reverend Frank Besant) यांच्याशी लग्न झाले होते. परंतु त्यांच्या निसर्गाबद्दलच्या स्वतंत्र विचारांमुळे त्यांना पतीचा विरोध होता. या कारणास्तव, त्यांनी आपल्या पतीशी संबंध तोडून मानवतेशी जोडण्याचा संकल्प केला.

भाषणापूर्वी ती 'ओम नम: शिवाय' म्हणायच्या

ईश्वर, बायबल आणि ख्रिस्ती धर्मावरील त्यांचा विश्वास डळमळीत झाला. त्यांचा विवाह कटुतापूर्ण वातावरणामध्ये मोडला गेला. 1873 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. धर्माला आव्हान देत धर्माच्या बुरसटलेल्या विचारांवर प्रहार करणारा त्यांनी लेख केला होता, त्यामुळे त्यांच्यावर खटलाही चालविण्याच आला होता. भारतात वास्तव्यास असताना त्यांनी स्वतःला कधीच परदेशी मानले नाही. हिंदू धर्मावर व्याख्यान देण्यापूर्वी त्या 'ओम नमः शिवाय' चा जप करायच्या. त्यांना मेम साहेब कोणी म्हटले तर आवडत नसे.

भारतावर प्रेम करा

अॅनी बेझंट यांना 'अम्मा' हे नाव खूप आवडत. त्यांचे भारतावर प्रंचड प्रेम होते. त्यांनी भारतातील लोकांची अविरत सेवा केली. भारतातील लोक त्यांना 'मा बसंत' म्हणू लागले. बेझंट यांना गांधीजी आदराने वसंत देवी म्हणत.

बनारसमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली

बेझंट यांनी काशीला आपले केंद्र बनवले. त्यांनी बनारसमध्ये 'सेंट्रल हिंदू कॉलेज' स्थापन केले. बालविवाह, जातिव्यवस्था, विधवा विवाह या सामाजिक प्रथा दूर करण्यासाठी 'ब्रदर्स ऑफ सर्व्हिस' नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. त्याचबरोबर त्या दोन मासिकेही प्रकाशित करायच्या ज्यातून ब्रिटीशांच्या विरोधात आवाज उठवायच्या. पुढे त्या काँग्रेसच्या अध्यक्षाही बनल्या.

ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले

1917 मध्ये, अॅनी बेझंट यांच्यासह दोन सहकाऱ्यांना ब्रिटिश सरकारने नजरकैदेत ठेवले. त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात देशभर बैठकाही झाल्या. निषेध मिरवणूकाही निघाल्या यात स्त्रिया मुक्तपणे सहभागी झाल्या होत्या.

बेंझट लोकांना 'हे' करण्यापासून वंचित करत

- मी जातीच्या आधारावर अस्पृश्यता करणार नाही

- मी माझ्या मुलांचे वयाच्या 18 वर्षांपूर्वी लग्न करणार नाही

- मी माझ्या मुलींचे वयाच्या 16 वर्षांपूर्वी लग्न करणार नाही

- मी पत्नी, मुली आणि कुटुंबातील इतर महिलांना शिक्षित करीन. मी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देईन. महिलांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.

- मी सामान्य लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करीन.

- मी सामाजिक आणि राजकीय जीवनात वर्ग आधारित भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही.

मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि दिग्दर्शनाखाली आध्यात्मिक शिक्षण आणि सामाजिक आणि राजकीय प्रगती क्षेत्रात कामगारांमध्ये एकता आणण्याचा प्रयत्न करेन.

भारतीय राजकारणात प्रवेश

त्यांनी 1914 मध्ये वयाच्या 68 व्या वर्षी भारतीय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी प्रभावी 'क्रांतिकारी चळवळ गृह नियम' सुरु केली. ही चळवळ भारतीय आणि काँग्रेस राजकारणाचा नवा जन्म मानली गेली. या चळवळीने भारताच्या राजकारणात आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांमध्ये धोरणात्मक बदल घडवून आणले.

नंतर गांधीजींशी झाले मतभेद

गांधीजींशी वैचारिक मतभेदामुळे त्यांनी हळूहळू काँग्रेसमधील सक्रियता कमी केली. 1924 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधिवेशन बेळगाव (Karnataka) येथे भरले. जेव्हा डॉ.बेसंत लांब रेल्वे प्रवास करुन बेळगावला पोहोचले तेव्हा अधिवेशन सुरु झाले होते. परंतु हा तो काळ होता जेव्हा गांधीजी राष्ट्रीय मंचावर उदयास येत होते. गांधींशी अॅनी बेझंट यांचे मतभेद यावरुन सुरू झाले की, दोघांनाही वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करायचा होता. याच कारणामुळे त्यांनी काँग्रेस सोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT