जातीचा जाच संपणार तरी कधी;दलित कुटुंबाच्या मंदिर प्रवेशावरून कर्नाटकात पुन्हा वाद

दलित कुटुंबाला एकूण 35,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता . त्यापैकी 25,000 रुपये दंड आणि उर्वरित 10,000 रुपये मंदिराच्या स्वच्छतेसाठी देण्यास सांगितले गेले होते (Koppal Village)
Dalit family fined 35k Koppal village  in Karnataka for entering in temple
Dalit family fined 35k Koppal village in Karnataka for entering in templeDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील (Karnataka) कोप्पल (Koppal) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका दलित कुटुंबाला (Dalit Family in Koppal) मंदिरात प्रवेश केल्याबद्दल 35,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.कोप्पल स्थित मियापुरा (Miyapur) गावात हि धक्कदायक घटना घडली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका दलित व्यक्तीचा 4 वर्षांचा मुलगा त्याच्या वाढदिवशी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेला होता, त्यानंतर हे प्रकरण घडले आहे. (Dalit family fined 35k Koppal village in Karnataka for entering in temple)

तथापि, तहसीलदार सिद्धेश यांनी सांगितले की नंतर गावातील प्रौढ लोकांनी माफी मागितली आणि सांगितले की गैरसमजामुळे हे सारे घडले होते . दलित कुटुंबाला एकूण 35,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता . त्यापैकी 25,000 रुपये दंड आणि उर्वरित 10,000 रुपये मंदिराच्या स्वच्छतेसाठी देण्यास सांगितले गेले होते . पोलिसांनी सांगितले की, चन्नदासर समाजातील दलितांना या प्रकरणी गुन्हा नोंदवन्यास नकार दिला आहे कारण त्यांनी म्हटले की, या कारवाईमुळे गावातील लोकांशी असलेले त्यांचे संबंध बिघडतील.

Dalit family fined 35k Koppal village  in Karnataka for entering in temple
भाजपने जम्मू -काश्मीरचं धर्माच्या आधारे विभाजन केलं,मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मुलाचे कुटुंब 4 सप्टेंबर रोजी त्याच्या वाढदिवशी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते. गावातील एक तरुण म्हणाला, 'त्याचे वडील प्रार्थना करत असताना मुलगा मंदिराच्या दिशेने गेला. या घटनेनंतर उच्च जातीच्या लोकांनी 11 सप्टेंबर रोजी एक बैठक घेतली आणि मंदिराच्या शुद्धीकरणाच्या उद्देशाने हवन करण्यासाठी 25,000 रुपये दंड ठोठावला.त्यानंतर चन्नदासर समाजाच्या सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधून लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

अधिकाऱ्यांनी लोकांना दलित मुलाच्या पालकांवर आरोप लावल्याबद्दल इशारा दिला आणि सांगितले की जर त्यांनी पुन्हा असे केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोप्पलचे पोलीस अधीक्षक टी. श्रीधर यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे देखील सांगितले जात आहे. दोषींना इशारा देण्यात आला असून त्यांनी मुलाच्या वडिलांची माफीही मागितली आहे . दलित कुटुंबाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस पीडितेच्या घरी गेले होते. तथापि, समाजातील लोकांनी शत्रुत्व निर्माण होऊ शकते म्हणून कार्य न करण्याचा निर्णय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com