पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची पहिली बैठक 24 सप्टेंबर रोजी

24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (America President Joe Biden) यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे.
Prime Minister Narendra Modi & America President Joe Biden will meet on 24 September
Prime Minister Narendra Modi & America President Joe Biden will meet on 24 September Dainik Gomantak
Published on
Updated on

24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (America President Joe Biden) यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. व्हाईट हाऊसने (White House) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.व्हाईट हाऊसने सांगितले की, येत्या शुक्रवारी राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल.पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यातील ही पहिली भेट असेल. या वर्षी जानेवारीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, जो बायडेन आणि पीएम मोदी यांनी अनेक प्रसंगी व्हर्च्युअली संवाद साधला आहे, परंतु दोघांमध्ये भेट होण्याची ही पहिलीच वेळ असेल.(Prime Minister Narendra Modi & America President Joe Biden will meet on 24 September)

याशिवाय, पीएम मोदी सुमारे दोन वर्षांनंतर अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला शेवटची भेट दिली ती सप्टेंबर 2019 मध्ये. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेत गेले होते.

Prime Minister Narendra Modi & America President Joe Biden will meet on 24 September
भारतासोबतचा सागरी सीमा वाद; बांग्लादेश UN मध्ये

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी जोबायडेन जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांचीही भेट घेतील. यानंतर, बायडेन प्रथमच क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन करतील. पीएम मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मेरिसन देखील यात उपस्थित असणार आहेत.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, यावर्षी 12 मार्च रोजी चार नेत्यांमध्ये ऑनलाईन बैठक झाली होती . जारी केलेल्या विधानानुसार, कोरोना रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, क्वाड लसीचा पहिला आढावा या बैठकीत घेतला जाईल, ज्याची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती.

राष्ट्रपती बायडेन सोमवारी न्यूयॉर्कला रवाना होतील, जेथे ते मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेला (यूएनजीए) संबोधित करतील.बायडेन न्यूयॉर्कमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मेरिसन यांची भेट घेतील. त्यानंतर, ते मंगळवारी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे 6 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जात आहेत. ही त्यांची वर्षातील दुसरी परदेश यात्रा असेल. यावर्षी मार्चमध्ये, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंती आणि बांगलादेशच्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बांगलादेशला भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com