पुणे: आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art Of Living) प्रणेते, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांच्याशी संवादाची संधी आज सकाळी 11.10 वाजता मिळणार आहे.
जीवनात शांती, मैत्री आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण मानवतेचा दृष्टोकोन अंगिकारून स्वतःमध्ये कशाप्रकारे बदल घडवू शकतो, याबद्दल श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत. यांसह भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या देशी गाईला रोजच्या जगण्यात महत्वाचे स्थान कसे देता येईल, याबद्दलही रविशंकर बोलतील. सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार त्यांच्याशी संवाद साधतील. उपस्थित प्रेक्षक-श्रोत्यांच्या प्रश्नांनाही श्री श्री रविशंकर उत्तरे देतील. (Dialog with Sri Sri Ravi Shankar)
हा कार्यक्रम झूम कॉलद्वारे होणार आहे. 'सकाळ'च्या फेसबूक (facebook.com/SakalNews) पेजवर आणि युट्यूब चॅनेलवरही (youtube.com/c/SakalMediaGroup) या कार्यक्रमाचा लाभ घेता येऊ शकतो.
भारतीय देशी गायींच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी सकाळ माध्यम समुहाने पुढाकार घेतला आहे. देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक २१ सप्टेंबर रोजी 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन'सोबत प्रकाशित होत आहे. या विशेषांकात श्री श्री रविशंकर यांच्यासह तज्ज्ञ, संशोधकांचे लेख आणि देशी गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर यशस्वी उद्योग उभ्या करणाऱ्यांच्या यशकथांचा समावेश आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेची बंगळूरजवळ गोशाला आहे. ही गोशाला देशातील सर्वोत्तम मानली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.