anand mahindra twitter viral video of village india got talent man cycling with incredible balance dainik gomantak
देश

आनंद महिंद्रांनी ट्विटरवर केला 'हा' व्हिडिओ शेअर, घेतला असा निर्णय?

...यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे

दैनिक गोमन्तक

आनंद महिंद्रा हे प्रवासादरम्यान एकाद्या ठिकाणी काही वेगळी घटना दिसली की नेहमीच त्याचा व्हिडिओ किंवा फोटो घेतात. यावेळीही त्यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दोन्ही हात सोडून सायकल चालवताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यावरही मोठे ओझे ही आहे. जाणून घ्या आनंद महिंद्रा या व्यक्तीच्या कौतुकात काय म्हणाले...

ही व्यक्ती मानवी सेगवे आहे...

आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी ट्विटरवर एका गावातील माणसाचा व्हिडिओ (viral video) शेअर केला आहे. हा माणूस डोक्यावर पेंढ्या घेऊन सायकल चालवत असून त्याने दोन्ही हात सोडले आहेत. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे.

'हा माणूस मानवी सेगवे आहे. यामध्ये गायरोस्कोप (एक प्रकारचा सेन्सर) शरीरात आधीच बसवलेला असतो. किती छान समतोल आहे. मला वाईट वाटते की आपल्या देशात या व्यक्तीसारखे आणखी बरेच लोक असतील जे खेळाडू बनू शकतील. पण त्यांना ओळखणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे सोपे नाही.

आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. यानंतर लोकांनी त्यांना अशा लोकांच्या कलेला वाव देण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत.

महिंद्रा 'यूट्यूब'वर चॅनल उघडणार?

विक्रम नावाच्या एका व्यक्तीने आनंद महिंद्रा यांना एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे सुचवले आहे. जिथे लोक व्हिडिओ अपलोड करू शकतात. क्रिकेट, फुटबॉल, अभिनय, गायन आणि नृत्य या क्षेत्रातील लोक याठिकाणी आपली कला सादर करू शकतील. दर महिन्याला ज्युरी प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्तम 3 लोकांना निवडतो आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देतो. यावर आनंद महिंद्रा म्हणाले की, ही कल्पना चांगली आहे, मग यावर आनंद महिंद्रा म्हणाले की यूट्यूबवर प्लॅटफॉर्म बनवायचा का? आणखी एका यूजरने लिहिले की, यासाठी आपण 'व्हिलेज गॉट टॅलेंट' सारखे प्लॅटफॉर्म बनवू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT