Viral Video : दिव्यांग तरुण जीवाची भीक मागत राहिला, पण...

एका जोडप्याने आपल्याच नातेवाईकाला लाठीने केली बेदम मारहाण
noida viral video Breathless beating the Handicapped disabled youth congress srinivas bv tweet
noida viral video Breathless beating the Handicapped disabled youth congress srinivas bv tweet Dainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका अपंग तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण जेवार भागातील आहे, जिथे एका जोडप्याने आपल्याच नातेवाईकाला लाठीने बेदम मारहाण केली आणि त्याची स्कूटरही फोडली. पीडित गजेंद्रच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जुगेंद्र आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. (noida viral video Breathless beating the Handicapped)

हा व्हिडिओ 27 मार्चचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये गजेंद्र या अपंग तरुणाला त्याच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. आरोपी जुगेंद्रने दिव्यांग गजेंद्रला त्याची शाळा चालवण्यासाठी दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. हे पाहता जुगेंद्रने शाळा भाड्याने घेतली. यावरून जुगेंद्र आणि गजेंद्र यांच्यात भांडण झाले. भांडण इतके वाढले की, रागाच्या भरात जुगेंद्रने पत्नीसह गजेंद्रला मारहाण केली. आणि त्याची स्कूटरही फोडली.

noida viral video Breathless beating the Handicapped disabled youth congress srinivas bv tweet
मोठ्या गुन्ह्याची होती तयारी, बॉम्बस्फोटाने हादरले 'हे' शहर

डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, पीडित गजेंद्रने पोलिसांत (police) तक्रार केली. त्यानंतर दोन्ही आरोपी पती-पत्नीला अटक करून न्यायालयात (court) हजर करण्यात आले.

दिव्यांगसोबत झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, “या द्वेषाच्या युगात आपण कोणत्या टप्प्यावर उभे आहोत. याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. माणुसकीला लाजवेल अशी ही चित्रे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com