Lord Rama Dainik Gomantak
देश

लव्हली युनिव्हर्सिटीत कहर, भगवान रामावर प्रोफेसरने केली आक्षेपार्ह टिप्पणी

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील (Lovely Professional University) एका सहाय्यक प्राध्यापकाला भगवान रामाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील एका सहाय्यक प्राध्यापकाला भगवान रामाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक गुरसंग प्रीत कौर यांच्या वक्तव्याचा एक कथित व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर (Social Media) समोर आला, त्यानंतर त्यांना काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. (An Assistant Professor at Lovely Professional University has made derogatory remarks about Lord Rama)

"आम्हाला समजले आहे की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे काही लोक दुखावले गेले आहेत, जिथे आमचे कर्मचारी सदस्य त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करताना दिसत आहेत," असे विद्यापीठाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेअर केलेले विचार पूर्णपणे वैयक्तिक आहेत. आम्ही त्यांच्या विचाराचे समर्थन करत नाही. त्याचबरोबर विद्यापीठात आम्ही सर्व धर्मांना समान स्थान देतो, असेही निवदेनादरम्यान म्हटले आहे.

विद्यापीठाने पुढे सांगितले की, ''सर्व विद्यार्थ्यांना आम्ही विद्यापीठात प्रेम आणि आदराने वागवतो. या प्रकरणी या प्राध्यापकाला तत्काळ सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तथापि, आम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल मनापासून खेद वाटतो." विद्यापीठाचे उपाध्यक्ष अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 'सहाय्यक प्राध्यापकाला (Professor) शनिवारी काढून टाकण्यात आले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT