An Artisan in Coimbatore, Tamil Nadu has created a 1.5-inch scale model of Chandrayaan 3 using 4 grams of gold. Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3 Landing: चंद्रावर उतरण्यापूर्वी सोनेरी 'चांद्रयान 3' तयार, पाहा व्हिडिओ

Chandrayaan-3 Landing Date: चांद्रयान-3 चा लँडर विक्रम उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सज्ज आहे. ही मोहीम यशस्वी होईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.

Ashutosh Masgaunde

Chandrayaan-3 to Land on Moon: चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रावर यशस्वी लँडिंगची आशा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतातही विविध गोष्टी केल्या जात आहेत.

आशात तामिळनाडूतील एका सोनाराने चांद्रयान 3 चे मॉडेल तयार केले आहे, ज्याची देशभरात चर्चा होत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी धार्मिक विधीही केले जात आहेत.

तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका कारागिराने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून चांद्रयान 3 चे 1.5 इंच आकाराचे मॉडेल तयार केले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

चांद्रयान-3 चा लँडर विक्रम उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सज्ज आहे. ही मोहीम यशस्वी होईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.

हे मॉडेल तयार करणाऱ्या कारागिराचे नाव मरियप्पन असे आहे. मरियप्पन म्हणतो की, जेव्हा जेव्हा एखादी महत्त्वाची घटना असते तेव्हा मी सोन्याचा वापर करून त्याचे एक लहान मॉडेल बनवतो.

प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. चांद्रयान 3 च्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून हे मॉडेल तयार केले आहे. हे करण्यासाठी मला ४८ तास लागले.

यशस्वी लँडिंगसाठी होम-हवन

याशिवाय 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशभरात होम-हवन सुरू झाले आहे.

प्रयागराजच्या श्री मठ बाघंबरी गड्डी आणि वाराणसीच्या कामाख्या देवी मंदिरात लोकांनी हवनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वाहतूक नियमांचे डोळ्यांसमोर उल्लंघन, रक्षक सुस्तच; राजधानी पणजीत पाटो पुलावर रात्रीची स्‍थिती गंभीर; 'नो एन्‍ट्री'तूनही शिरतात वाहने

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

ED Raid Goa: 'साळगावकर' समूहाची 1,023.85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

Horoscope: बुधाच्या राशीबदलाचा मोठा प्रभाव! 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळणार मोठे यश

Marwar History Rathore Dynasty: औरंगजेबालाही झुकवणारा रणधुरंधर! दुर्गादास राठोडांनी 30 वर्षे लढून वाचवले 'मारवाड'चे स्वातंत्र्य

SCROLL FOR NEXT