Waris Punjab De  Dainik Gomantak
देश

Waris Punjab De: पंजाबमध्ये अमृतपाल समर्थकांचा राडा! साथीदाराच्या सुटकेसाठी पोलिस ठाण्याला घेराव

बंदुक, तलवारींसह समर्थकांची पोलिसांशी चकमक, बॅरिकेड तोडून पोलिस ठाण्यात प्रवेश

Akshay Nirmale

Amritpal Singh's Supporters clash with police: पंजाबमध्ये अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय तुफान सिंग याच्या अटकेच्या विरोधात 'वारीस पंजाब दे' या खलिस्तान समर्थक संघटनेचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

हजारो संतप्त समर्थकांच्या जमावाने बंदुका, तलवारी आणि काठ्या घेऊन अमृतसरमधील पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून समर्थकांनी पोलिस ठाण्यात प्रवेश केला. (Waris Punjab De)

अमृतपाल यांनीच गुरुवारी सकाळी 11 वाजता समर्थकांना अजनाला येथे जमण्यास सांगितले होते. यानंतर येथे गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीसही सक्रिय झाले आणि त्यांनी पोहोचण्यापूर्वीच अमृतपालच्या समर्थकांना उचलण्यास सुरुवात केली. यामुळे वातावरण तापले.

या गोंधळाची माहिती मिळताच अमृतपालनेही अजनाळा पोलीस ठाणे गाठले. येथे त्यांनी एसएसपी सतींदर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर तुफान सिंगला सोडण्यासाठी पोलिसांना एक तासाचा अल्टिमेटम दिला. यावेळी समर्थक पोलीस ठाण्याबाहेर उभे होते.

अमृतपाल, त्याचा साथीदार तुफान सिंग याच्यासह 30 जणांविरुद्ध अजनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतपालविरोधात सोशल मीडियावर टिप्पणी करणाऱ्या तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्याला बेदम मारहाण झाली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तुफान सिंगला अटक केली होती. यामुळे संतापलेल्या अमृतपालने गुरुवारी अजनाळा पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आपल्या अटकेची घोषणा केली होती.

15 फेब्रुवारीच्या रात्री अजनाला येथे पोहोचलेल्या चमकौर साहिब येथील बरिंदर सिंग यांचे काही लोकांनी अपहरण केले होते. जंदियाला गुरुजवळ (जिथे अमृतपाल देखील उपस्थित होता) बरिंदर सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT