Amit Shah slams congress on Namaz recitation Dainik Gomantak
देश

'रस्ते बंद करून नमाजपठण करणारे... अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत तुष्टीकरण करणारे लोक देशाचे कल्याण करू शकत नाहीत

दैनिक गोमन्तक

डेहराडून (Dehradun) येथील सभेत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेसवर (Congress)जोरदार निशाणा साधत तुष्टीकरण करणारे लोक देशाचे कल्याण करू शकत नाहीत असा टोला देखील लगावला आहे. त्याचबरोबर जे रस्ते बंद करून नमाज पढू देतात अणि देशाचे तुष्टीकरण करणारे लोक देवभूमीचे काम कधीच करू शकत नाहीत. निवडणुका आल्या की काँग्रेसला जनतेची आठवण येते.असे म्हणत अमित शाह यांनी कॉंग्रेसला लक्ष केले आहे. (Amit Shah slams congress on Namaz recitation)

"मी आलो तेव्हा माझ्या गाड्यांचा ताफा अचानक थांबला आणि काही लोक मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना विचारले, काय झाले? तर त्यांनी सांगितले की आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग बंद करून तेथे नमाज अदा केली जाते.रस्ते बंद करून नमाजपठणाची परवानगी देणारे आणि तुष्टीकरण करणारे देवभूमीचे काम कधीच करू शकत नाहीत."

"अटलजींनी उत्तराखंड बनवले होते. मोदीजी उत्तराखंडला सजवत आहेत. उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल. मोदीजी गरीबांच्या घरातून येतात, ते गरिबांचा विचार करतात. घसियारी कल्याण योजनेचा मोठा फायदा राज्यातल्या एक लाख शेतकऱ्यांना होईल. या योजनेचा लाभ घ्या." असे आवाहन देखील अमित शहांनी केले आहे.यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, निवडणूक आली की काँग्रेसवाले लगेच नवीन कपडे शिवून घेतात. मात्र जनतेच्या कल्याणासाठी पाच वर्षे कुठे होतात असा सवाल देखील त्यांनी काँग्रेसला केला आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही कुठे होता? वेगवेगळ्या मुद्द्यांवर कामगिरी करा. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार, घोटाळे, घोटाळे यांचा समानार्थी राहिला आहे.असा थेट आरोप देखील अमित शहांनी केला केलाआहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात उत्तराखंडमधील सर्व प्राथमिक कृषी सोसायट्या संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. आता त्यांना थेट केंद्रीय योजनांचा संपूर्ण लाभ मिळणार आहे त्या साऱ्या लोकांना नाबार्डशी जोडण्याचा आमचा मानस आहे. संपूर्ण देशात उत्तराखंड मॉडेलचे पालन केले जाईल. आम्ही दिलेल्या आश्वासनांपैकी 84 टक्क्यांहून अधिक आश्वासनांची पूर्तता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा आश्वासने झुगारणारा पक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT