पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकनला पोहोचल्यानंतर पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्यात ही पहिलीच वन-ऑन-वन भेट होती. 2013 मध्ये पोप बनल्यानंतर फ्रान्सिस यांनी भेट घेतलेले मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांनाही भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. पोप यांनी 1999 भारताला भेट दिली होती. या दरम्यान अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि पोप जॉन पॉल द्वितीय भारत भेटीवर आले होते.
व्हॅटिकनमध्ये मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकरही (S. Jaishankar) उपस्थित होते. पंतप्रधानांनी व्हॅटिकन सिटीचे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन यांचीही भेट घेतली. ऐतिहासिक बैठकीपूर्वी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी शुक्रवारी सांगितले की, पंतप्रधान पोपसोबत स्वतंत्र बैठक घेणार आहेत. रोममध्ये पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हणाले होते की, 'आम्ही पोप यांना वैयक्तिकरित्या भेटणार आहोत.'
व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केला नाही
''उद्या पंतप्रधान व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील आणि त्यानंतर ते G20 च्या सत्रांना उपस्थित राहतील, जेथे त्यांच्या सहभागी देशांशी द्विपक्षीय बैठका होतील, आम्ही तुम्हाला माहिती देत राहू.'' बैठकीनंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होऊ शकते. व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केलेला नाही," असही श्रुंगला यांनी यावेळी म्हटले.
शिवाय. मोदी यांनी म्हटले, 'माझा विश्वास आहे की, परंपरा अशी आहे की जेव्ह पोप फ्रान्सीस यांच्याशी चर्चा होते तेव्हा कोणताही अजेंडा नसतो आणि आम्ही त्यांचा आदर करतो. मला खात्री आहे की, या काळात आपण सर्वसाधारणपणे जागतिक परिस्थिती आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या समस्यांबद्दल चर्चेत सहभागी होऊ.'' कोविड-19, आरोग्य समस्या, आपण एकत्र कसे काम करु शकतो...'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.