Amit Shah  Twitter/ANI
देश

अमित शहांनी कोविड प्रोटोकॉलला दिली तिलांजली, मास्क न घालता कैरानात केला प्रचार

यूपी विधानसभा निवडणुकीत शनिवारी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रचारासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात पोहोचले.

दैनिक गोमन्तक

यूपी विधानसभा निवडणुकीत शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघात पोहोचले. पश्चिम उत्तर प्रदेशातील स्थलांतराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या या शहरात अमित शहा (Amit Shah) यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यांनी जनतेला भाजपला (BJP) मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटून सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी अमित शहा यांनी मास्क घातलेला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांचीही पायमल्ली करताना दिसले. (Amit Shah Campaigned In Kairana Without Wearing A Mask Disregarding The Kovid Protocol)

दरम्यान, निवडणूक आयोगाने केवळ पाच जणांसोबत घरोघरी प्रचार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र शहा यांच्यासोबत बरीच गर्दी होती. यावेळी तिथे जबरदस्त सुरक्षा व्यवस्थाही पाहायला मिळाली. शेकडो कार्यकर्त्यांसह अमित शहा कैरानाच्या अरुंद रस्त्यांवरुन प्रचार करत होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही पाहायला मिळाली. अमित शाह साधू स्वीट शॉपचे मालक राकेश गर्ग यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांच्याशी चर्चा केली.

तसेच, कैरानातून हिंदूंच्या पलायनाच्या वेळी राकेशनेही शहर सोडले होते, परंतु आता मी पुन्हा परतलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अमित शहा यांनी कैरानामधील जाहीर सभा पुढे ढकलली. श्यामलीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शहा तेथून थेट रवाना झाले. पक्षाचे बडे नेते आणि निवडणूक प्रभारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शिवाय, मागील यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम यूपीमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. याठिकाणी बहुतांश जागांवर पक्षाला यश मिळाले, मात्र यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत घरोघरी जाऊन मतदारांची मने जिंकण्याचा पक्षाचा प्रयत्न सुरु आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून अमित शहा घरोघरी जावून प्रचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Goa Live News: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची भेट

SCROLL FOR NEXT