आगामी काळात जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक होणार: अमित शहा

सरकारी योजनांचा थेट लाभ येथील जनतेला मिळत आहे, असे अमित शहा म्हणाले.
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी काळात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील विधानसभेच्या जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येथे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात अनेक विकासकामे केली जात आहेत. विक्रमी संख्येने पर्यटकांनी (Tourists) जम्मू-काश्मीरला भेट देत आहेत. सरकारी योजनांचा थेट लाभ येथील जनतेला मिळत आहे.

Amit Shah
सुपरटेक प्रकल्पात फ्लॅट बुक करणाऱ्यांना व्याजासह मिळणार पैसे; सर्वोच्च न्यायालय

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) परिस्थिती सामान्य होताच त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन लोकसभेत देण्यात आले आहे. जम्मू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्य सचिव डॉ. अरुणकुमार मेहता, भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अधिकारी आणि राज्याचे प्रशासकीय सचिव उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने विकास काम सुरू आहेत. लोकांना शिक्षण-आरोग्य आणि केंद्राच्या योजनांचा लाभ मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com