Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'अखेरची' सफारी ठरली असती, पिसाळलेल्या हत्तीने गाडीचा केला पाठलाग, पर्यटकांची झाली पळापळ, पाहा व्हिडिओ

Elephant chase safari video: उत्तर प्रदेशातील बिजनोरमधील अफझलगड भागातील अमनगढ व्याघ्र प्रकल्पात नुकतेच एक भयानक संकट टळल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील बिजनोरमधील अफझलगड भागातील अमनगढ व्याघ्र प्रकल्पात नुकतेच एक भयानक संकट टळल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीहून आलेले एक पर्यटक जोडपे जंगल सफारीसाठी येथे दाखल झाले होते. त्यांनी सफारीसाठी एक जिप्सी बुक केली होती आणि त्यांच्यासोबत व्याघ्र प्रकल्पाचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार ए.आर. रहमान सफरीला उपस्थित होते.

सफारी सुरू असताना अचानक जंगलातून लांब दात असलेला एक हत्ती बाहेर आला आणि पर्यटकांच्या जिप्सीच्या दिशेने वेगाने येऊ लागला. परिस्थिती गंभीर होताच त्या महिला पर्यटकाने भीतीपोटी किंचाळायला सुरुवात केली. तिचा साथीदार देखील हादरला. त्याचवेळी हत्तीनेही गर्जना केल्याने वातावरणात अधिकच भीतीचे सावट निर्माण झाले.

चालकाने ही धोकादायक परिस्थिती ओळखून जिप्सीचा वेग तातडीने वाढवला. तरीही हत्ती काही अंतरापर्यंत सतत जिप्सीचा पाठलाग करत राहिला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण पर्यटकांनी त्यांच्या मोबाईल फोनवर करण्यात आले असून ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.

यानंतर चालकाने आपल्या सजगतेने आणि कौशल्यपूर्ण ड्रायव्हिंगने जिप्सी सुरक्षितपणे वळवून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पातील गेस्ट हाऊसमध्ये परत आणले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.

वन्यजीव तज्ञांच्या माहितीनुसार, एकटा हत्ती साधारणपणे आपल्या कळपापासून दूर राहतो आणि अशा हत्तींची वागणूक अनेकदा आक्रमक होत असते. याच कारणामुळे या हत्तीने असा पाठलाग केला असावा. दरम्यान, कोणत्याही पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाचे अधिकारी या हत्तीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Aridhaman: भारताची ताकद वाढणार! अणुशक्तीवर चालणारी तिसरी पाणबुडी लवकरच ताफ्यात दाखल होणार; नौदल प्रमुखांची मोठी घोषणा VIDEO

Goa Politics: 'युती'च्या तोंडावर 'यादी'चा बॉम्ब! "चर्चा सुरू असताना यादी जाहीर करणं धक्कादायक", काँग्रेसच्या भूमिकेवर मनोज परब नाराज

DEADLINE ALERT! फक्त 31 डिसेंबरपर्यंत वेळ! लगेच करा 'हे' काम, नाहीतर तुमचं 'PAN Card' होईल बंद

Quelossim Bus Issue: ..अन्यथा बस अडवू! केळशी सरपंचाचा इशारा; मोबोर मार्गावर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिल्यावरून संताप व्यक्त

VIDEO: मॅच जिंकली, पण 'ही' गोष्ट विसरला! रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, 'हिटमॅन असाच आहे'

SCROLL FOR NEXT