Allu Arjun In Shaktiman's Character Dainik Gomantak
देश

Shaktimaan Movie: रणवीर सिंग नव्हे, तर अल्लू अर्जुन दिसणार शक्तिमानच्या भूमिकेत; बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 सारखं वादळ येणार?

Allu Arjun In Shaktiman's Character: ९० च्या दशकातील मुलांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करणाऱ्या 'शक्तिमान' या लोकप्रिय टीव्ही शोच्या पुनरागमनाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Sameer Amunekar

९० च्या दशकातील मुलांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करणाऱ्या 'शक्तिमान' या लोकप्रिय टीव्ही शोच्या पुनरागमनाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्या काळात रविवारी संपूर्ण कुटुंब शंभर टक्के मनोरंजनासाठी दूरदर्शनसमोर बसायचं, आणि या शोमध्ये अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान हा पात्र सर्वांचाच लाडका बनला होता.

या शोमध्ये "गंगाधर मे ही शक्तिमान है" ही प्रसिद्ध ओळ अजूनही अनेकांच्या आठवणीत कोरली गेली आहे. विज्ञान, अध्यात्म आणि नीतिमूल्यांचा संगम असलेल्या या मालिकेने केवळ मुलांनाच नव्हे तर प्रौढ प्रेक्षकांनाही आपलंसं केलं होतं.

गेल्या काही वर्षांपासून या शोच्या रीमेक किंवा चित्रपटरूपात पुनरागमन होण्याच्या चर्चांना वेग आला होता. खुद्द मुकेश खन्ना यांनीही काही वेळा अशा सूचनांना दुजोरा दिला होता. एक वेळ अशीही होती जेव्हा शक्तिमानचा बॉलिवूडपट बनवण्याचे संकेत देण्यात आले होते, आणि यासाठी बड्या निर्मात्यांची चर्चा सुरू होती.

आता मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट दिग्दर्शक बेसिल जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार आहे. बेसिल जोसेफ हे ‘मिन्नल मुरली’सारख्या सुपरहिरो चित्रपटासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा 'शक्तिमान'च्या नव्या रुपात दिसून येणार आहे.

विशेष म्हणजे, 'शक्तिमान'ची मूळ भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी स्वतः पुढे येत अल्लू अर्जुनला या भूमिकेसाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या मते, अल्लू अर्जुनकडे आवश्यक ती उर्जा, अभिनयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व आहे, जी 'शक्तिमान'सारख्या पात्रासाठी आवश्यक असते.

चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत घोषणा बाकी असली तरी, अल्लू अर्जुनसारखा अभिनेता या आयकॉनिक भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची शक्यता चाहत्यांना उत्सुकतेने भरून टाकणारी आहे. जर ही बातमी खरी ठरली, तर 'शक्तिमान' या भारतीय सुपरहिरोला नव्या पिढीसाठी पुन्हा नव्या रूपात सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT