Karnataka Decision On Hijab Dainik Gomantak
देश

'या' दिवशी तरी हिजाब घालू द्या, विद्यार्थिनींची कर्नाटक उच्च न्यायालयात मागणी;

विद्यार्थिनींना शुक्रवारी हिजाब घालण्याची परवानगी द्या. खंडपीठाने सांगितले की ठीक आहे, आम्ही तुमच्या विनंतीवर विचार करू. मात्र सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

हिजाब वादावर आज पुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विद्यार्थिनींची बाजू मांडणारे वकील विनोद कुलकर्णी यांनी खंडपीठाला विनंती केली की, कृपया विद्यार्थिनींना शुक्रवारी हिजाब (Hijab) घालण्याची परवानगी द्या. खंडपीठाने सांगितले की ठीक आहे, आम्ही तुमच्या विनंतीवर विचार करू. त्यानंतर काही वेळातच सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली.(Karnataka Decision On Hijab)

हिजाब वादावर गुरुवारी कर्नाटक (Karnataka) उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली. पार्टी-इन-पर्सन विनोद कुलकर्णी यांनी खंडपीठाला विनंती केली की शुक्रवारी मुलींना शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी द्यावी. विनोद कुलकर्णी म्हणाले, "शुक्रवार झुमा आहे. कृपया मुलींना किमान शुक्रवारी हिजाब घालण्याची परवानगी द्या. या अंतरिम आदेशामुळे मोठ्या प्रमाणात उन्माद निर्माण होत आहे. यावर विचार करू. तत्पूर्वी, याचिकाकर्त्यांतर्फे वकील रहमतुल्ला कोथवाल यांनी मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्राचा संदर्भ दिला आणि सांगितले की UDHR नुसार प्रत्येकाला धर्माचे स्वातंत्र्य आणि विवेकाचे स्वातंत्र्य आहे.

त्याचवेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादाबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याची याचिका फेटाळून लावली. ही जनहित याचिका नियमांनुसार दाखल करण्यात आल्याने आम्ही समाधानी नाही. त्याचवेळी, गुरुवारी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याच्या परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

हिजाब जानेवारीपासून आले चर्चेत
हिजाबचा हा मुद्दा कर्नाटक मध्ये जानेवारी महिण्यात सुरू झाला होता. उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

कर्नाटकात तीन दिवस शाळा, महाविद्यालये होते बंद

काही दिवसांपूर्वी कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात आले होते. यामुळे कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटानांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT