भारतातील 'या' ठिकाणांना फक्त परदेशी पर्यटकचं देवू शकतात भेट

भारत हे जगातील एक असे ठिकाण आहे, जिथे दरवर्षी हजारो लोक बाहेरून भेट देण्यासाठी येतात. असे असूनही, देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे भारतातील लोक भेट देऊ शकत नाहीत
Top 5 places in india were indians are not allowed to visit
Top 5 places in india were indians are not allowed to visit Dainik Gomantak
Top 5 places in india were indians are not allowed to visit
Top 5 places in india were indians are not allowed to visit Dainik Gomantak

भारतात असे काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना जाण्यास बंदी आहे. परदेशी पर्यटकांचे (Tourist) तिथे खुलेपणाने स्वागत केले जात मात्र भारतीयांना (India) तिथे प्रवेश नाकारला जातो. या बंदीमुळे भारतीयांना त्यांच्याच देशात या ठिकाणी जाता येत नाही. परदेशी पर्यटकांसाठी नेहमी खुले असलेली ती ठिकाणे कोणती आहेत ते बघूया...

Goa
Goa Dainik Gomantak

हा बीच गोव्यात आहे. या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर (Tourism) अवलंबून आहे, ज्यामध्ये परदेशी पर्यटकांचा मोठा हिस्सा आहे. असे म्हटले जाते की येथे असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे केवळ परदेशी पर्यटकांना प्रवेश दिला जातो. भारतीय पर्यटकांना या समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यास बंदी आहे. परदेशी पर्यटकांची शांतता भंग होऊ नये, हे यामागचे कारण आहे.

Sentinel Island
Sentinel IslandDainik Gomantak

अंदमान आणि निकोबार बेटांमधील उत्तर सेंटिनेल बेटावर फक्त आदिवासी राहतात. या बेटाचा बाह्य जगाशी संपर्क नाही. या बेटावर बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मनाई आहे.

Free Kasol Cafe
Free Kasol Cafe Dainik Gomantak

फ्री कासोल कॅफे हिमाचल प्रदेशातील कसोल येथे बनवला आहे. हा कॅफे इस्रायली वंशाचे लोक चालवतात. भारतीय पर्यटकांना तिथे जाण्यास बंदी आहे. कॅफेचे संचालक म्हणतात की ते फक्त त्यांच्या सदस्यांना जेवण आणि नाश्ता देतात. या मुद्द्यावरून अनेकदा वादही झाले आहेत. पण अर्थव्यवस्थेत विदेशी पर्यटकांचा दर्जा पाहता सरकार या बाबतीत फारशी कठोर भूमिका घेत नाही.

Red Lollipop
Red LollipopDainik Gomantak

चेन्नईतील रेड लॉलीपॉप हॉस्टेलमध्ये फक्त परदेशी पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो. हॉटेल मॅनेजर्सचे म्हणणे आहे की ते फक्त भारतात पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकांना सेवा देते. भारतातील देशी पर्यटकांना आपल्या सुविधा देत नाही. या ठिकाणी पासपोर्ट पाहून प्रवेश दिला जातो.

Uno-In
Uno-InDainik Gomantak

बंगळुरू शहरात बांधलेल्या Uno-In नावाच्या हॉटेलमध्ये भारतीय लोकांना जाण्यास बंदी होती. हॉटेलमध्ये फक्त जपानमधील लोकांनाच प्रवेश देण्यात येतो. हे हॉटेल 2012 मध्ये बांधण्यात आले होते. यानंतर हॉटेलवर वांशिक भेदभावाचा आरोप झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी ते बंद करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com