Akhilesh Yadav and Mamata Banrjee Twitter
देश

'पूर्वांचलची जनता भाजपला माफ नाही तर साफ करणार'

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, यूपीमध्येही भाजपला पराभव पत्करावा लागणार

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election) महाअंतिम फेरी वाराणसीमध्ये (Varanasi) होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्वांचलच्या सात जिल्ह्यांमध्ये 7 मार्चला होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी ताकद पणाला लावली आहे. सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी वाराणसीला केंद्रस्थानी ठेवले आहे. आज रिंगरोडच्या बाजूला असलेल्या ऐधे गावात सपा आघाडीच्या मेळाव्यात अखिलेश यादव (Akhilesh Yadav), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह अनेक नेत्यांनी जल्लोष केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, यूपीमध्ये खेला होबे होणार. त्यांनी मंचावरून सपाच्या (Samajwadi Party) विजयाच्या आणि भाजपला हटविण्याच्या घोषणा दिल्या. 'मी बनारस विमानतळावरून घाटात जात असताना भाजपच्या गुंडांनी माझी गाडी अडवली. त्यांनी माझ्या गाडीवर लाठ्या मारल्या आणि येथून परत जा असे सांगितले. तेव्हा मला समजले की भाजप यूपीमध्ये किती हताश आणि निराश आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, यूपीमध्येही भाजपला पराभव पत्करावा लागणार,' असा दावा ममता बॅनर्जी यांनी आज केला.

'सातव्या टप्प्यात भाजपची सफाई होणार, ममता बॅनर्जी येथे आल्याबरोबर भाजपचा पराभव होणार नाही. आज सहाव्या टप्प्यातील मतदान आहे. सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यावर भाजपचा पराभवच होणार आहे. पूर्वांचलची जनता भाजपला माफ करणार नाही तर साफ करणार आहे. लोकांनी सपाचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा,' दावा अखिलेश यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये विरोधी पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. येथे 7 मार्च रोजी मतदान होत आहे. 5 मार्च रोजी सायंकाळी येथे प्रचाराची सांगता होणार आहे. दुसरीकडे, प्रियांका गांधी रामनगर आणि रोहनियामध्ये जाहीर सभा आणि घरोघरी प्रचार करणार आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसीत रोड शो करणार आहेत. प्रियांका आणि राहुल गांधी यांची जाहीर सभाही प्रस्तावित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT