Supreme Court Dainik Gomantak
देश

Prabhat Gupta Murder Case: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनींना SC चा दणका

Supreme Court: तिकोनिया येथील प्रसिद्ध प्रभात गुप्ता हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Prabhat Gupta Murder Case: तिकोनिया येथील प्रसिद्ध प्रभात गुप्ता हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी टेनी यांचा केस ट्रान्सफरचा अर्ज फेटाळून लावला आहे. अजय मिश्रा टेनी यांनी प्रभात गुप्ता हत्या प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठाकडे वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. लखनौ खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, प्रभात यांच्या हत्येची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठातच होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे. हे अपील अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर टेनी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दुसरीकडे, प्रभात गुप्ता हत्याकांडातील प्रमुख अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra Tenny) यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या अपीलावरील सुनावणी सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने 10 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती रेणू अग्रवाल यांच्या खंडपीठाने 2004 मध्ये राज्य सरकारने दाखल केलेल्या अपीलवर हा आदेश दिला. पीडित पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीशांनी आधीच जलद केली आहे.

काय आहे प्रभात गुप्ता खून प्रकरण?

लखनौ विद्यापीठाचे विद्यार्थी नेते प्रभात गुप्ता यांची 8 जुलै 2000 रोजी लखीमपूर खेरी येथील तिकोनिया येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये अजय मिश्रा टेनीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 मार्च 2004 रोजी लखीमपूर येथील न्यायालयाने टेनी यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात मृतकाचे वडील संतोष गुप्ता यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करुन जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

SCROLL FOR NEXT