Rajasthan, Bharatpur |IAF Plane Crash Dainik Gomantak
देश

Watch Video: राजस्थानमधील भरतपूरमध्ये भारतीय सैन्याच्या विमानांचा अपघात, पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ कोसळलं विमान

Rajasthan, Bharatpur: राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेच्या विमानाचा अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

IAF Plane Crash: राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे पिंगोरा रेल्वे स्थानकाजवळ हवाई दलाचे विमान कोसळले आहे. या अपघातात विमानाचे तुकडे उडून गेले आहेत. त्यात आग लागली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या फायटर जेटने आग्रा येथून उड्डाण केले. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

हे लढाऊ विमान कुठून टेक ऑफ केले? कुठे चालले होते? विमानात किती लोक होते हे अद्याप समजू शकलेले नाही. प्रशासनाने आपली बाजू हवाई दलाला दिली आहे. घटनास्थळी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या अपघातानंतर पायलट बाहेर पडला आहे. पण, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी पथके आली आहेत. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

येथे काही तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान संरक्षण विमान असल्याचे सांगितले जात आहे. पण, अजून स्पष्ट झाले नाही. त्या विमानाचा आकाशातच स्फोट झाला होता, आता त्यात कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.

  • मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले

मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली. घटनेनंतर माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी म्हणाले की, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले.

या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की, आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT