Air India Compensation Rule Dainik Gomantak
देश

Ahmedabad Plane Crash: विमान अपघातात मृत्यू झाल्यास Air India किती भरपाई देते? प्रवास विमा किती महत्त्वाचा आहे? नियम काय आहेत? जाणून घ्या

Air India Compensation Rule: जर एखाद्या प्रवाशाचा विमान अपघातात मृत्यू झाला किंवा तो गंभीर जखमी झाला तर त्या प्रवाशाला किंवा त्याच्या कुटुंबाला किती भरपाई मिळेल? विमा नसतानाही काही मदत मिळते का? याबाबत जाणून घ्या सर्व माहिती.

Sameer Amunekar

गुजरातमधील अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर, प्रवास विम्याचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. विमान अपघात झाल्यास प्रवाशांना कोणते अधिकार आणि किती भरपाई मिळू शकते हा प्रश्न आहे. प्रवास विम्याचा किती फायदा होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रवास विमा नसला तरीही आपल्याला भरपाई मिळते का? विमान कंपन्यांकडून भरपाईबाबत काय नियम आहेत? जाणून घेऊया सर्व माहिती.

विमान अपघात झाल्यास प्रवाशांना कोणते अधिकार आणि संरक्षण मिळते? मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत, एअर इंडिया पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची कायदेशीर जबाबदारी घेते.

विमान प्रवास करण्यापूर्वी सुरक्षितता आणि भविष्यातील नियोजन खूप महत्वाचे आहे. कोणत्याही अनुचित घटनेच्या बाबतीत एक लहान प्रवास विमा योजना एक उत्तम आधार ठरू शकते. सुरक्षित प्रवासासाठी विम्याची सवय लावा.

भरपाईबाबत काय नियम आहेत?

भारतासह अनेक देशांमध्ये, विमान अपघातांबाबत एअरलाइनची जबाबदारी १९९९ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत निश्चित केली जाते. या आंतरराष्ट्रीय नियमानुसार, एअरलाइनला प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला किमान १.४ कोटी रुपये भरपाई द्यावी लागते.

अपघातात कोणाचीही चूक असली तरी. जर हे सिद्ध झाले की हा अपघात एअरलाइनच्या निष्काळजीपणामुळे झाला, तर भरपाईची रक्कम आणखी जास्त असू शकते. डीजीसीए अंतर्गत देशांतर्गत उड्डाणांमध्येही असेच नियम लागू आहेत.

प्रवास विम्याचा फायदा काय आहे?

विमान प्रवासात अपघात होण्याची शक्यता अतिशय कमी असली, तरी एकदा का अपघात झाला, तर त्याचे परिणाम गंभीर असतात. अशा वेळी प्रवाशाने जर प्रवास विमा घेतलेला असेल, तर तो एअरलाइनच्या भरपाई व्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडूनही आर्थिक मदतीस पात्र ठरतो.

प्रवास विम्याअंतर्गत प्रवाशाला खालील प्रकारचे लाभ मिळू शकतात

  • अपघाती मृत्यू कव्हर: विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना २५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला मिळू शकतो.

  • वैद्यकीय आपत्कालीन मदत व रुग्णालय खर्च: अपघातात जखमी झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे किंवा तत्काळ वैद्यकीय उपचाराचे खर्च विमा कंपनी भरते.

  • सामान हरवणे किंवा उड्डाण रद्द होणे: सामान हरवल्यास किंवा फ्लाइट रद्द झाल्यास त्यासाठी नुकसान भरपाईचा दावा करता येतो.

  • अपंगत्व कव्हर: अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक आधार मिळतो.

  • रुग्णालय रोख लाभ: काही विमा पॉलिसींमध्ये, रुग्णालयात भरती राहिल्यास दररोज निश्चित रक्कम आर्थिक मदतीसाठी दिली जाते.

विमान प्रवासादरम्यान प्रवास विमा घेतलेला नसला, तरी काही विशेष बाबतीत प्रवाशाला भरपाई किंवा आर्थिक मदत मिळू शकते. यासाठी काही नियम आणि पर्यायी स्त्रोत कार्यरत आहेत.

मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन अंतर्गत भरपाई

जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू, दुखापत किंवा सामानाचे नुकसान झाले असेल, तर मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन 1999 या आंतरराष्ट्रीय करारानुसार एअरलाइन कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते.

  • विशेष म्हणजे, जर तुम्ही ऑफिस ट्रिपवर असाल, तरीही ही भरपाई लागू होते.

  • यासोबतच, अनेक कंपन्यांच्या ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत कर्मचारी प्रवास करत असतील, तर त्यांना त्या पॉलिसीचा लाभ मिळू शकतो.

क्रेडिट कार्ड ट्रॅव्हल इन्शुरन्स

काही क्रेडिट कार्ड कंपन्या आपोआप प्रवास विमा सुविधा देतात, जर तिकीट त्या कार्डवरून बुक केले असेल.

  • या कार्डांच्या अटी वाचून पहा, कारण काही कार्डांमध्ये अपघाती मृत्यू, वैद्यकीय मदत, फ्लाइट रद्द होणे, सामान हरवणे यासाठी संरक्षण दिले जाते.

  • व्हिसा, मास्टरकार्ड, अ‍ॅमेरीकन एक्सप्रेस यांसारख्या कंपन्यांचे प्रीमियम कार्ड्स ही सुविधा देतात.

टूर ऑपरेटर किंवा ग्रुप टूर इन्शुरन्स

जर तुम्ही एखाद्या टूर ऑपरेटरच्या पॅकेज टूरद्वारे प्रवास केला असेल, तर त्यांच्या गटविम्याचा (group insurance) फायदा मिळू शकतो.

  • काही नामांकित टूर कंपन्या आपल्या पॅकेजमध्ये प्रवाशांसाठी विमा समाविष्ट करत असतात.

  • अपघात, फ्लाइट डिले, रद्द होणे किंवा वैद्यकीय गरजांसाठी यामार्फत मदत मिळू शकते.

विमान अपघात झाल्यानंतर पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र अनेक वेळा ही भरपाई वेळेत मिळत नाही आणि प्रक्रिया दीर्घकाळ अडकून राहते. यामागे काही महत्वाची कारणं असतात.

अपघाताची चौकशी पूर्ण होण्यास वेळ लागतो

विमान अपघातानंतर संबंधित विमान वाहतूक संस्था, नागरी विमानन मंत्रालय, विमान कंपनी आणि इतर तपास यंत्रणा यांच्याकडून तपासणी व चौकशी केली जाते.

  • अपघाताचे कारण शोधणे, ब्लॅक बॉक्सचा डेटा विश्लेषण करणे आणि जबाबदारी निश्चित करणे या सर्व प्रक्रिया वेळखाऊ असतात.

  • त्यामुळे भरपाई देण्याची प्रक्रिया चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबते.

विमा पॉलिसीमधील त्रुटी

अनेकदा विमा घेताना ग्राहक नॉमिनीची माहिती भरत नाहीत किंवा अपडेट करत नाहीत.

  • अशा वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणाला भरपाई द्यायची, हे ठरवताना कायदेशीर अडचणी निर्माण होतात.

  • त्यामुळे विमा कंपनीला अधिकृत दस्तऐवज मागवावे लागतात आणि यामुळे दाव्याच्या मंजुरीस विलंब होतो.

जर विमा कंपनीने भरपाई नाकारली किंवा अपुरी भरपाई दिली, तर कुटुंबीयांना खालील कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागतो

विमान प्रवासाच्या आधी 'या' ४ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

विमान प्रवास सुरक्षित असला तरी, अचानक आपत्ती, अपघात किंवा वैद्यकीय गरज उद्भवू शकते. अशा प्रसंगात आर्थिक आणि वैद्यकीय मदत वेळेवर मिळावी यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

प्रवास विमा

  • अनेक प्रवासी फक्त आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमा घेतात, पण देशांतर्गत प्रवासातही विमा तितकाच महत्त्वाचा आहे.

  • अपघात, फ्लाइट रद्द होणे, सामान हरवणे किंवा वैद्यकीय अडचणी या सर्व गोष्टी कोणत्याही प्रवासात होऊ शकतात.

नॉमिनी माहिती योग्यरित्या भरा

  • विमा पॉलिसीमध्ये नॉमिनीची माहिती स्पष्टपणे आणि अचूकपणे भरलेली असावी.

  • पॉलिसीधारकाच्या निधनानंतर भरपाईचा दावा करताना ही माहिती अत्यंत आवश्यक ठरते. चुकीची किंवा रिकामी माहिती असल्यास दावा प्रक्रिया लांबते.

पॉलिसीमध्ये अपघाती, वैद्यकीय कव्हर असणे आवश्यक

  • फक्त अपघाती मृत्यू कव्हर असलेली पॉलिसी अपुरी ठरू शकते.

  • वैद्यकीय खर्च, आपत्कालीन उपचार, हॉस्पिटलायझेशन, मेडिकल एवॅक्युएशन यांचा समावेश असलेली पॉलिसी निवडा.

विम्याची डिजिटल व प्रिंट प्रत

  • विमा घेतल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी मोबाईलमध्ये आणि प्रिंट कॉपी कागदावर ठेवणे गरजेचे.

  • अपघात किंवा अडचणीच्या प्रसंगी पॉलिसी नंबर, कंपनीचा संपर्क, आणि इतर तपशील लगेच सादर करता यावेत यासाठी ही तयारी उपयोगी ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT