
Unknown Facts About Goa: गोव्याचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार निसर्गरम्यता आणि पर्यटन स्थळे येतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं हे छोटं राज्य केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर इथल्या समृद्ध संस्कृती, इतिहासासाठी आणि शांत वातावरणासाठीही प्रसिद्ध आहे. तुम्ही जर का गोव्याला जायच्या विचारात असाल आणि या राज्याबद्दल थोडक्यात माहिती हवी असेल तर शेवटपर्यंत नक्की वाचा. गोव्यातील सर्वात मोठं शहर कोणतं, सर्वात सुंदर शहर कोणतं, सर्वात स्वस्त शहर कोणतं अशी वेगवेगळी माहिती जाणून घेऊया.
गोव्यातील सर्वात मोठं शहर वास्को (Vasco da Gama) आहे. हे शहर मुरगाव तालुक्यात येतं आणि मुरगाव बंदरामुळे (Mormugao Port) ते एक महत्त्वाचं औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळखलं जातंय. वास्कोमध्ये दक्षिण गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच दाबोळी एअरपोर्ट (Dabolim Airport) असल्यामुळे पर्यटकांसाठीही ते महत्त्वाचं प्रवेशद्वार बनतं. पणजी ही गोव्याची राजधानी असली तरी, लोकसंख्येच्या आणि भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने वास्को हेच सर्वात मोठं शहर आहे.
गोव्याला प्राचीन काळापासून विविध नावांनी ओळखलं जातं, ही नावं गोव्याच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. गोव्याची काही ऐतिहासिक नावे अशी आहेत:
गोमंतक (Gomantak): हे नाव सर्वात जुन्या आणि प्रचलित नावांपैकी एक आहे, जे पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतं.
गोमांचल (Gomanchal): हे नाव गोव्याच्या डोंगराळ आणि निसर्गरम्य भूभागामुळे आलं असावं.
गोपकपट्टण (Gopakapattana): हे नाव गोव्याच्या प्राचीन बंदराचा संदर्भ देतं.
गोवे (Goa): पोर्तुगीजांच्या आगमनानंतर हे नाव अधिक प्रचलित झालं.
या नावांव्यतिरिक्त, कादंबऱ्या, प्रवासवर्णनं आणि ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये गोव्याला 'अपरांत', 'सुवर्णभूमी' आणि 'परशुराम भूमी' अशा इतर नावांनीही संबोधलं गेलं आहे.
गोव्यामध्ये अनेक सुंदर शहरे आहेतच, पण राजधानी पणजी (Panaji) हे गोव्यातील सर्वात सुंदर शहर म्हणावं लागेल. मांडावी नदीच्या काठी वसलेलं पणजी शहर, पोर्तुगीज स्थापत्यकलेची सुंदर उदाहरणं, रंगीबेरंगी इमारती, आकर्षक चर्चेस जसं की अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन आणि शांत वातावरण यामुळे पर्यटकांना आकर्षित करतं.
पणजी शहरातील फोंतेन्हास हे जुनं लॅटिन क्वार्टर विशेषतः त्याच्या पोर्तुगीज प्रभावासाठी आणि चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पणजी हे एक छोटं आणि सुंदर शहर असल्याने इथे सहजपणे फिरता येतं आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव अगदी जवळून अनुभव घेता येतो.
गोव्यातील सर्वात मोठे गाव कुंक्कळी असून ते दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात येतं. लोकसंख्या आणि भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने कुंक्कळी हे गोव्यातील एक मोठं आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वचं गाव म्हणून ओळखलं जातं.
गोव्याला 'स्वस्त' म्हणणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही, कारण गोव्यातील खर्च तुमच्या राहणीमानावर आणि तुम्ही निवडलेल्या ठिकाणांवर अवलंबून असतो.
पर्यटनाच्या दृष्टीने: गोव्यामध्ये बजेटमध्ये राहण्यापासून ते आलिशान हॉटेल्सपर्यंत सर्व पर्याय उपलब्ध आहेत. स्थानिक खाद्यान्न (जैसे की सी-फूड, फिश थाळी) आणि स्थानिक वाहतूक (बस, स्कूटर भाड्याने) स्वस्त असू शकतात. मात्र, प्रसिद्ध पर्यटन स्थळांजवळ, उच्च श्रेणीतील रेस्टॉरंट्समध्ये आणि विदेशी मद्यांसाठी खर्च जास्त येऊ शकतो.
राहण्यासाठी: गोव्यामध्ये घरभाडे आणि काही जीवनावश्यक वस्तूंची किंमत इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत जास्त असू शकते, विशेषतः पर्यटन हंगामात इथल्या किंमती वाढतात त्यामुळे, गोवा हे काही लोकांसाठी स्वस्त वाटू शकतो, तर काहींसाठी महागडा ठरू शकतो.
गोव्यामध्ये एकूण १३ शहरं आहेत. ही शहरे खालीलप्रमाणे आहेत:
पणजी (Panaji - राजधानी)
वास्को(Vasco da Gama)
मडगाव (Margao)
म्हापसा (Mapusa)
फोंडा (Ponda)
डिचोली (Bicholim)
कुंक्कळी (Cuncolim )
साखळी (Sankhalim)
केपे (Quepem)
काणकोण (Canacona)
सांगे (Sanguem)
मुरगाव (Mormugao)
पर्वरी (Porvorim)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.