seat 11A miracle plane crash Dainik Gomantak
देश

Ahmedabad Plane Crash: 27 वर्षांनंतर विमान अपघातात 'तोच' चमत्कार! "11A सीटने वाचवले होते प्राण" थाई अभिनेत्याने सांगितला अनुभव

11A Seat Mystery: एअर इंडिया दुर्घटनेतील एकमेव वाचलेला व्यक्ती देखील 11A सीटवर बसला होता हे कळल्यावर, अंगावर सर्रकन काटा आल्याचं तो म्हणालाय

Akshata Chhatre

Thai Actor Survives Crash: अहमदाबादजवळ झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. या दुर्दैवी अपघातातून एकमेव प्रवासी वाचल्याची बातमी समोर आल्यानंतर, एक अविश्वसनीय योगायोग उघडकीस आलाय आणि याने सर्वांनाच थक्क केलंय. २७ वर्षांपूर्वी एका जीवघेण्या विमान अपघातातून बचावलेल्या थाई अभिनेता-गायक रुंगसक लॉयचुसक याला एअर इंडिया दुर्घटनेतील एकमेव वाचलेला व्यक्ती देखील 11A सीटवर बसला होता हे कळल्यावर अंगावर सर्रकन काटा आल्याचं तो म्हणालाय.

२७ वर्षांपूर्वीचा चमत्कार; रुंगसकचा थरारक अनुभव

११ डिसेंबर १९९८ रोजी, अवघ्या २० वर्षांचा रुंगसक लॉयचुसक त्यावेळी मृत्यूच्या दाढेतून वाचला होता. थाई एअरवेजचे (Thai Airways) TG261 विमान दक्षिण थायलंडमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बिघडलं आणि दलदलीत कोसळलं. विमानात असलेल्या १४६ लोकांपैकी १०१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, पण रुंगसक यात वाचला.

आता ४७ वर्षांच्या असलेल्या रुंगसकने एअर इंडियाच्या AI171 विमान अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेल्या ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश याच्या सीट क्रमांकाबद्दल ऐकल्यावर त्याला धक्काच बसला. रमेश हा रुंगसक १९९८ मध्ये ज्या सीटवर बसला होता, त्याच 11A सीटवर होता. रुंगसकने थाई भाषेत केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे,

"भारतातील विमान अपघातात वाचलेला व्यक्ती. तो माझ्याच सीटवर बसला होता, 11A." रुंगसकने सांगितले की, १९९८ मधील त्याच्या बोर्डिंग पासची आठवण त्याला नाही, पण वृत्तपत्रांमध्ये त्याच्या सीट क्रमांक आणि वाचल्याची बातमी त्यावेळी नोंदवली गेली होती.

मृत्यूच्या दाढेतून परतलेला एकमेव प्रवासी

गुरुवारी (दि.१२) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बोइंग ड्रीमलायनर विमान कोसळलं. विमानात असलेल्या २४२ लोकांपैकी विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी या अपघातातून जिवंत बचावला. आपत्कालीन निर्गमनद्वाराजवळ बसलेला रमेश, आदळल्यामुळे विमानातून बाहेर फेकला गेला. अनेक जखमा होऊनही, तो विमानांच्या ढिगाऱ्यातून स्वतःहून बाहेर आला आणि वाट पाहत असलेल्या रुग्णवाहिकेत पोहोचला.

"काही काळ मला वाटले की मीही मरणार आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा मला समजले की मी जिवंत आहे आणि मी सीटबेल्ट सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला," असं भयावह वर्णन त्याने केलंय.

११-अ सीटचे आकर्षण आणि समाजमाध्यमांवरील चर्चा

विश्वास रमेशच्या याबचावामुळे जनतेला आश्चर्याचा धक्का बसला असून, जगभरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे व्यावसायिक विमानांमधील आपत्कालीन निर्गमनद्वाराजवळील जागांना, विशेषतः 11A सीटला, मोठी मागणी वाढली आहे. समाजमाध्यमांवर अनेकजण त्यांच्या पुढील प्रवासासाठी ही जागा आरक्षित करण्याबद्दल पोस्ट करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live Updates: अवैध वास्तव्य प्रकरणी मांद्रे पोलिसांकडून युगांडाच्या नागरिकाला अटक

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

Goa: नोकरीचे आमिष देऊन आणले गोव्यात, केले लैंगिक शोषण; केनियाच्या पीडितेची सुटका; नुकसानभरपाई मंजूर

Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

Margao Master Plan: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ काहींचे ‘निवृत्ती पॅकेज’! सरदेसाईंचा आरोप; लाेकांचा आराखडा बनवण्‍याचे आश्‍वासन

SCROLL FOR NEXT