Air India technical fault Dainik Gomantak
देश

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाला DGCA चा दणका!! अहमदाबाद विमान अपघातानंतर तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

Air India officers suspended: विमान कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई

Akshata Chhatre

DGCA action on Air India: अहमदाबाद-लंडन विमान अपघातानंतर काहीच दिवसांत, देशाच्या विमान वाहतूक नियामक संस्थेने म्हणजेच 'नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयाने' (DGCA) एअर इंडियाविरोधात कडक पावले उचलली आहेत. विमान कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. विशेष म्हणजे, एअर इंडियाने स्वतःच या चुकांची कबुली दिली होती.

नेमका काय होता प्रकार?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अनेकवेळा असे झाले की, कर्मचाऱ्यांकडे आवश्यक परवाने नसताना, त्यांना पुरेशी विश्रांती न देता आणि नियमानुसार ते 'ताजेतवाने' नसतानाही त्यांना विमानाचे काम देण्यात आले. एव्हीएशन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (ARMS) मधून सीएई फ्लाईट अँड क्रू मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल करताना केलेल्या तपासणीत या चुका समोर आल्या.

२० जून रोजी DGCA ने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, "कंपनीने स्वतःहून माहिती दिली असली तरी, कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक बनवण्यात, नियम पाळण्यात आणि अंतर्गत जबाबदारीमध्ये मोठ्या चुका झाल्या आहेत. या चुकांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न होणे ही चिंतेची बाब आहे."

DGCA ने या चुकांसाठी थेट तीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे:

चूरह सिंह (विभागीय उपाध्यक्ष)

पिंकी मित्तल (संचालन विभागातील मुख्य व्यवस्थापक)

पायल अरोरा (कर्मचारी वेळापत्रक - नियोजन)

या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांची चुकीची नेमणूक, परवाना आणि रिकन्सी (कामावर परत येण्यापूर्वी आवश्यक विश्रांती आणि सराव) नियमांचे उल्लंघन आणि वेळापत्रकात मोठ्या चुका केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळून २४१ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच हे आदेश आले आहेत, त्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

DGCA चे आदेश आणि एअर इंडियाची भूमिका

DGCA ने एअर इंडियाला या तिन्ही अधिकाऱ्यांना कर्मचारी वेळापत्रक आणि कामाच्या वाटणीशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांमधून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांच्याविरुद्ध तात्काळ अंतर्गत चौकशी सुरू करावी आणि १० दिवसांच्या आत DGCA ला अहवाल सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. जोपर्यंत वेळापत्रकातील चुका सुधारल्या जात नाहीत, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना विमान सुरक्षा किंवा कर्मचाऱ्यांच्या नियमांच्या पालनाशी संबंधित कोणतेही काम दिले जाणार नाही.

DGCA च्या या कारवाईवर एअर इंडियाने सांगितले आहे की, "आम्ही नियामक मंडळाचा आदेश स्वीकारला असून, त्याची अंमलबजावणी केली आहे. सध्या कंपनीचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसरथेट इंटिग्रेटेड ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरवर लक्ष ठेवतील." एअर इंडियाच्या प्रवक्त्याने पुढे म्हटले की, "आम्ही सुरक्षा नियमांचे आणि पद्धतींचे पूर्णपणे पालन करण्यास कटिबद्ध आहोत." या कारवाईमुळे बाकी विमान कंपन्या देखील सुरक्षा नियम आणि कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकाबाबत अधिक काळजी घेतील अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT