Narendra Modi

Agriculture 

 

Dainik Gomantak 

देश

शेतीला निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडले पाहिजे: पंतप्रधान मोदी

“खतांमुळे हरितक्रांती झाली यात शंका नाही. पण हे देखील खरे आहे की आपल्याला पर्यायांवर काम करत राहावे लागेल," मोदी म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राष्ट्रीय कृषी (Agriculture) आणि अन्न प्रक्रिया परिषदेला (National Summit on Agro and Food Processing) संबोधित करताना सरकारने शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी गेल्या सात वर्षात केलेल्या कामाबद्दल भाष्य केले. मातीचे चांगले उत्पादन आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.

“खतांमुळे हरितक्रांती झाली यात शंका नाही. पण हे देखील खरे आहे की आपल्याला पर्यायांवर काम करत राहावे लागेल. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला इतर देशांकडून खते आयात करावी लागतात, त्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. म्हणूनच, (नैसर्गिक शेतीबद्दल) जागरुक राहण्याची गरज आहे,” असे पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून शेतीला बाहेर काढून निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडले पाहिजे. खतांमध्ये जी काही शक्ती असते ती निसर्गातही आढळते. आपल्याला फक्त त्याचा शोध घ्यावा लागेल."

“बियाण्यापासून ते मातीपर्यंत, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करू शकता. नैसर्गिक शेतीमध्ये खते किंवा कीटकनाशकांवर खर्च होत नाही. याला कमी सिंचनाची गरज आहे, ”पीएम मोदी यांनी शेतकऱ्यांना सूचित केले.

"शेतीबरोबरच, शेतकरी पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, सौर ऊर्जा आणि जैव इंधन यांसारख्या अनेक पर्यायी उत्पन्नाच्या स्रोतांशी जोडले जात आहेत. गावांमध्ये साठवणूक, शीत साखळी आणि अन्न प्रक्रिया मजबूत करण्यासाठी लाखो कोटींची तरतूद करण्यात आली आहे,” असे ते म्हणाले.

गुजरातचे (Gujarat) राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी परिषदेला संबोधित करताना, गांडुळ खत आणि गुरांचे शेण, गूळ आणि इतर नैसर्गिक संसाधनांमुळे माती कशी सुपीक होऊ शकते आणि परिणामी पीक उत्पादनात वाढ होऊ शकते याबद्दल माहिती दिली. नैसर्गिकरीत्या खत तयार करण्याच्या प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती दिली. ही परिषद 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT