Telangana News | Agnipath Scheme Protest Dainik Gomantak
देश

Agnipath Scheme Protest: सिकंदराबादमध्ये 1 ठार, 15 हून अधिक जखमी

अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान तेलंगणातील सिकंदराबादमध्ये 1 ठार, 15 हून अधिक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारच्या तिन्ही सैन्य दलात भरतीसाठी सुरु करण्यात आलेल्या 'अग्निपथ योजने'विरोधात देशभरात विरोध होत आहे. दरम्यान, तेलंगणातील सिकंदराबाद येथे निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यात 3 जण जखमी झाले.

लोक सकाळपासून आंदोलन करत होते

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच तेलंगणातील (Telangana) सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने तरुण पोहोचले होते. ते स्थानकावर अग्निपथ योजनेला विरोध करत होते. यादरम्यान काही आंदोलकांनी स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनला आग लावली. निदर्शनादरम्यान लोकांनी पोलिसांवर (Police) दगडफेकही केली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

बिहारमधील 5 रेल्वे स्थानके बंद

देशभरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे आज 17 जून रोजी अनेक रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. बहुतांश गाड्या पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील आहेत. त्याचबरोबर बिहारमधील (Bihar) 5 रेल्वे स्थानके बंद करण्यात आली आहेत. दिल्ली-कोलकाता मार्गावर बिहारची 5 स्थानके बंद करण्यात आली आहेत.

सरकारने वयोमर्यादा वाढवली

सरकारने अग्निपथ योजनेच्या पहिल्या बॅचसाठी वयोमर्यादेत बदल केला आहे. अग्निपथ योजनेतील वयोमर्यादा 21 वर्षांवरुन 23 वर्षे करण्यात आली आहे. 2 वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT