After tractor rally, Rahul Gandhi now pedals cycle to Parliament Dainik Gomantak
देश

राहुल गांधींचे 'ब्रेकफास्ट पॉलिटिक्स', बैठकीनंतर संसदेवर सायकल मोर्चा

आज काँग्रेस(Congress) नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील देशातील विरोधी पक्षांनी संसदेवर सायकल मार्च(Bicycle March) काढला आहे

दैनिक गोमन्तक

आज काँग्रेस(Congress) नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील देशातील विरोधी पक्षांनी संसदेवर सायकल मार्च(Bicycle March) काढला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससच्या(Pegasus) मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी संसदेत(Parliament) विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकूण 14 विरोधी पक्ष सहभागी झाले होते, सभेचे नेतृत्व राहुल गांधी करत होते.(After tractor rally, Rahul Gandhi now pedals cycle to Parliament)

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सायकल घेऊन संसदेवर मोर्चा काढला. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, कार्ती चिदंबरम, गौरव गोगोई आणि इतर नेते सहभागी झाले होते. यादरम्यान राजदचे खासदार मनोज झा म्हणाले की, विरोधकांच्या संयुक्त बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट आहे आणि सरकारला घेराव घालण्यास आम्ही तयार आहोत.

बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांना पेगासस हेरगिरी वादाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा हवी आहे पण सरकार मात्र ही चर्चा करण्यास तयार नाही.

संसदेत अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरताना दिसत आहेत. त्यातच सरकारने पेगासेस प्रकरणावर संसदेत चर्चा करण्यास विरोध दर्शवल्याने तर विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.त्याचबरोबर कृषी कायद्यावरूनही विरोधक सरकारला पाहिल्या दिवसापासून घेरताना दिसत आहेत.यावरच बोलवल्याला बैठकीला संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांचे नेते मंगळवारी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले, परंतु आम आदमी पक्षाचा एकही सदस्य या बैठकीला उपस्थित नव्हता.सोमवारीच राहुल यांनी विरोधी पक्षांच्या संसदीय पक्षाच्या नेत्यांना मंगळवारी सकाळी नाश्त्यासाठी आमंत्रण पाठवले होते. या नाश्त्याचा खरा हेतू विरोधी पक्षाशी भाजपविरोधातील एक सामान्य रणनीतीवर चर्चा करणे आहे. बैठकीत समांतर संसद चालवण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, राजद, सपा, माकप, भाकप, आययूएमएल, केरळ काँग्रेस (एम), झारखंड मुक्ती मोर्चा, क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी), नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि लोकशाही लोकांनी राहुल यांचे आमंत्रण स्वीकारत बैठकीला हजेरी लावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT