Agnipath Scheme Dainik Gomantak
देश

Agnipath Scheme विरोधात दाखल याचिकेवरील सुनावनी ढकलली पुढे

अग्निपथ योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) दिल्ली उच्च न्यायालयात (High Court of Delhi) दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र करण्यासाठी सांगितले आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात दाखल सर्व याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये 25 ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे. (Adjourning the hearing on petition filed against the Agneepath scheme the Delhi High Court said)

अग्निपथ योजनेबाबत विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली उच्च न्यायालयामध्ये वर्ग केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सशस्त्र दलात भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व जनहित याचिका हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंडच्या उच्च न्यायालयांना या योजनेच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करा, असे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत निर्णय स्थगित ठेवण्यास देखील सांगितले आहेत.

"या न्यायालयासमोर दाखल झालेल्या तीन रिट याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित केल्या जाव्यात आणि घटनेच्या अनुच्छेद 226 नुसार त्यांची संख्या बदलली जावी, असे आमचे मत आहे," असे खंडपीठाने यावेळी म्हटले आहे. सामान्यत: आम्ही याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात नव्याने जाण्याचे स्वातंत्र्य देऊन या याचिका निकाली काढल्या असत्या, परंतु याचिका मागे घेण्याच्या आणि नव्याने दाखल करण्याच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलण्याचे टाळले.' असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

SCROLL FOR NEXT