Goa Haryana Fruit Trade Dainik Gomantak
देश

गोव्याचे काजू, नारळ हरियाणात विकणार; हरियाणाची फळे, भाजीपाला गोव्यात पाठवणार...

आदित्य चौटाला यांची माहिती; गोव्याचे शिष्टमंडळ 19 तारखेला हरियाणात

Akshay Nirmale

Haryana News: गोव्यात दरवर्षी 70 लाख पर्यटक येत असतात. हरियाणातील पेरू आणि किन्नो ही फळे गोव्यात विकू आणि गोव्यातील नारळ, काजू ही उत्पादने हरियाणात विकण्यात येतील, अशी माहिती हरियाणा राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष आदित्य देवी लाल चौटाला यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ लिंकेज मार्केट उपलब्ध करून देऊ. त्यासाठी इतर राज्यांशी सामंज्यस करार करून हरियाणाची फळे, भाजीपाला इतर राज्यांच्या बाजारपेठेत विकण्यात येईल, असे ते म्हणाले.

गोव्याचे शिष्टमंडळ 19 तारखेला हरियाणात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये येथील बाजारपेठा आणि उत्पादनांवर चर्चा होणार आहे. यानंतर हिमाचल, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि यूपीचे शिष्टमंडळ येणार आहे. ज्यांच्यासोबत MOU करण्यात येईल.

ते म्हणाले की, या मेळाव्याचे आयोजन पूर्वीपेक्षा खूप मोठे आणि भव्य प्रमाणात करण्यात आले असून, यामध्ये दूरदूरवरून शेतकरी सहभागी होतील. शेतमाल साठवणुकीबाबतही सरकार नव्याने विचार करत आहे.

त्यांनी सांगितले की, हरियाणा राज्य कृषी पणन मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. कृषी उपकरणांच्या अपघातांसाठी क्लेम मिळण्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

जर एखाद्या शेतकऱ्याचा टाकीत बुडून मृत्यू झाल्यास, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना, शेतात काम करताना, कालव्याचे पाणी लावताना, पीक विक्रीवेळी गेट पास मिळाल्यानंतर 12 तासांत रस्ता अपघातात मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल.

भाजप सर्व 10 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार

भाजप-जेजेपी युतीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांनी सिरसा सभेत स्पष्ट केले आहे की भाजप हरियाणातील दहाही जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल. हे मी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT