Hospital  Dainik Gomantak
देश

चिंतेत भर! दिल्लीत मंकीपॉक्सचा 5वा रुग्ण आढळला, 22 वर्षीय महिला एलएनजेपी रुग्णालयात दाखल

कोरोनाची भिती लोकांच्या मनातून कमी होताच एका नवीन रोगाने तोंड वर काढले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाची भिती लोकांच्या मनातून कमी होताच एका नवीन रोगाने तोंड वर काढले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या मंकीपॉक्स रोगाचा दिल्लीमध्ये पाचवा रुग्ण आढळून आला आहे. नायजेरियाला गेलेल्या आफ्रिकन वंशाच्या 22 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची पुष्टी झाल्यानंतर उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सर्व बाधित आणि संशयित रुग्णांवर डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे. (Add to the concern 5th monkeypox patient found in Delhi 22 yeas old woman admitted to LNJP hospital)

एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी शनिवारी सांगितले की, दिल्लीत मंकीपॉक्सचा 5 वा रुग्ण आढळून आला आहे. डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारी 22 वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले असून ती सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.

4 रुग्ण रुग्णालयात दाखल असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला. तर दिल्लीत मंकीपॉक्सचे एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. काल ती 22 वर्षिय महिला पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांनी असेही नमूद केले की महिलेचा कोणताही अलीकडे प्रवास केलेला नाही परंतु तिने एक महिना आधी प्रवास केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्याच्या एका दिवसानंतर, या वर्षी 24 जुलै रोजी दिल्लीत मांकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. केंद्र सरकारने (Central Government) भारतात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती, त्यापैकी एक म्हणजे देशात प्रवेश करताना नियम पाळणे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आजारी व्यक्ती, मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतर लोकांशी जवळचा संपर्क टाळण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण 14 जुलै रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आढळून आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोसिस म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेला विषाणू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT