Supreme Court Dainik Gomantak
देश

Adani Hindenburg Case: ''हिंडेनबर्गचा रिपोर्ट योग्य मानण्याची गरज नाही'', SC ने अदानी प्रकरणी निर्णय ठेवला राखून!

Supreme Court on Adani Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चर्चा पूर्ण झाली आहे.

Manish Jadhav

Supreme Court on Adani Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चर्चा पूर्ण झाली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला. शुक्रवारी, न्यायालयाने सांगितले की, सेबीला सर्व 24 प्रकरणांचा तपास पूर्ण करावा लागेल. सेबीने 25 ऑगस्ट रोजी अदानी समूहाने शेअरच्या किमतीत फेरफार केल्याच्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

हिंडेनबर्ग अहवाल वस्तुस्थितीनुसार सत्य म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही

अहवालात म्हटले आहे की, सेबीने 24 पैकी 22 प्रकरणांचा तपास पूर्ण केला आहे. सेबी आता सर्व 24 प्रकरणांचा तपास पूर्ण करेल. न्यायालयाने म्हटले की, आम्हाला हिंडनबर्ग अहवाल वस्तुस्थितीनुसार खरा मानण्याची गरज नाही.

हिंडेनबर्ग अहवालाची सत्यता तपासण्याचे कोणतेही साधन नाही आणि म्हणून सेबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. आरोप करताना काही जबाबदारी असलीच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांना फटकारले

यासोबतच, अदानी-हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित खटल्यातील सुनावणीदरम्यान एलआयसी आणि एसबीआयच्या भूमिकेची चौकशी करण्याच्या काही याचिकाकर्त्यांच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले. कोणत्याही ठोस आधार आणि पुराव्याशिवाय अशी मागणी करणे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणताही आरोप करण्यापूर्वी त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा, असेही न्यायालयाने पुढे म्हटले.

वृत्तपत्रात प्रकाशित झालेली कोणतीही बातमी सत्य म्हणून घेण्यास सेबीला सांगता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी अदानीच्या शेअर्समधील (Shares) गुंतवणुकीची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्याचा फायदा कोणाला झाला हेही पाहायला हवे.

या प्रकरणी सेबीने प्रत्येक पैलूची चौकशी केली असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना सोमवारपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले आहे.

काय आहे अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण?

दरम्यान, 24 जानेवारी रोजी यूएस-आधारित शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये अदानी समूहावर शेअरच्या किमती वाढवण्याच्या उद्देशाने हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रत्युत्तरादाखल अदानी समूहाने आरोपांचे खंडन करणारे 413 पानांचे उत्तर प्रकाशित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT