Supreme Court: ‘न्यायाधीश साहेब, मी जिवंत आहे…’ मुलाला जिवंत असल्याचा SC मध्ये का द्यावा लागला पुरावा?

Supreme Court Hearing Pilibhit Murder Case: सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी झाली.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court Hearing Pilibhit Murder Case: सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली.

जेव्हा एका 11 वर्षाच्या मुलाने न्यायालयात हजर होऊन आपण जिवंत असल्याचे सांगितले. हे प्रकरण एका मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. मुलाने न्यायालयात दावा केला की, त्याच्या वडिलांनी आपल्या आजोबा आणि मामाला त्याच्या हत्येच्या प्रकरणात अडकवले.

याचिका स्वीकारत न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे सांगितले. यासोबतच न्यायालयाने यूपी सरकार, पिलीभीतचे एसपी आणि न्यूरिया पोलिसांचे एसएचओ यांना नोटीस बजावली आहे.

TOI नुसार, याचिकाकर्त्याचे वकील कुलदीप जोहरी यांनी सांगितले की, मुलगा फेब्रुवारी 2013 पासून आपल्या आजोबांसोबत राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे वडील हुंड्यासाठी त्याच्या आईला बेदम मारहाण करायचे.

वकिलाच्या म्हणण्यानुसार, दोघांचे 2010 मध्ये लग्न झाले होते. मार्च 2013 मध्ये मुलाच्या आईला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Supreme Court
Supreme Court: 'देवाचे आभार माना... सरकारने काहीच केले नाही; वायू प्रदूषणावर SC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाच्या आजोबांनी त्यांच्या जावयावर आयपीसी कलम 340 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, वडिलांनी मुलाचा ताबा मागितला. त्यावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

वकिलाने सांगितले की, मुलाच्या वडिलांनी या वर्षी जानेवारीमध्ये त्याचे आजोबा आणि मामाविरुद्ध मुलाचा खून केल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 302, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाबाबत वकिलाने सांगितले की, त्यांनी एफआयआरसह अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर मुलला जिवंत असल्याचा पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हजर राहावे लागले. पुढील वर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com