Delhi High Court Dainik Gomantak
देश

लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् दीड कोटी लुबाडल्याचा आरोप, तरीही जामीन? कोर्टाने समजावला डेटिंग व मॅरेज अ‍ॅपमधील फरक

याचिकाकर्त्याने सुरुवातीला IIT खडगपूरमधून अभियांत्रिकी पदवी, यूके आणि न्यूझीलंडमधून डबल मास्टर्स आणि लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून पीएचडी असल्याचा दावा केला होता, परंतु नंतर तो फक्त बीएससी पदवीधर असल्याचे उघड झाले.

Ashutosh Masgaunde

Accused of raping and robbing crores on the lure of marriage, still got bail? Delhi High Court explained the difference between dating and marriage apps:

डेटिंग अ‍ॅपवर एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.

न्यायमूर्ती विकास महाजन यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना, असे निरीक्षण नोंदवून आरोपीला जामीन मंजूर केला की, तो आणि तक्रारदार महिलेची भेट मॅट्रिमोनिअल अ‍ॅपवर नव्हे तर डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. आणि त्यांच्यामध्ये झालेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये त्याने लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे सूचित होत नाही.

न्यायालयाने म्हटले आहे की, तक्रारदार आणि याचिकाकर्ते यांची भेट कोणत्याही वैवाहिक अ‍ॅपवर नसून ‘हिंज’ या डेटिंग अ‍ॅपवर झाली हे स्पष्ट आहे. त्यांच्यामध्ये अनेक व्हॉट्सअ‍ॅप संदेशांची देवाणघेवाण झाली आहे आणि याचिकाकर्त्याने कोणत्याही संदेशात लग्नाचे वचन दिलेले नाही."

न्यायालयाने असेही नमूद केले की, तक्रारदाराने खुलासा केला होता की, याचिकाकर्त्याने तिच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल खोटे बोलल्याचे तिला कळल्यानंतरही ती चार दिवस एअरबीएनबीमध्ये त्याच्यासोबत राहिली आणि वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 आणि 420 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आलेल्या एका प्रकरणात जामीन मागणाऱ्या व्यक्तीच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

याचिकाकर्ते आणि तक्रारदार 'हिंज'वर भेटले आणि प्रेमात पडले, असे म्हटले आहे. याचिकाकर्त्याने सुरुवातीला IIT खडगपूरमधून अभियांत्रिकी पदवी, यूके आणि न्यूझीलंडमधून डबल मास्टर्स आणि लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून पीएचडी असल्याचा दावा केला होता, परंतु नंतर तो फक्त बीएससी पदवीधर असल्याचे उघड झाले.

तक्रारदार महिलेने असाही दावा केला आहे की, तिने याचिकाकर्त्याला त्याच्या उपचारासाठी अंदाजे 1.2 कोटी रुपये दिले होते.

न्यायालयाने युक्तिवाद विचारात घेतला आणि म्हटले की, फिर्यादीने जानेवारी 2021 मध्ये आरोपीला 25,000 रुपयांचे पहिले पेमेंट केले त्याने ते पैसे परत केले नाहीत. तरीही महिलेने त्याला मोठ्या प्रमाणात पैसे देणे सुरूच ठेवले.

खंडपीठाने सांगितले की, “प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन याचिकाकर्त्याने नियमित जामीन मंजूर करण्यासाठी केस तयार केली आहे.” त्यानुसार, याचिकाकर्त्याला 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sholay Re Release: ..शेवटी अमिताभ बच्चन यांना जिवंत करण्याचे ठरवले, सलीम- जावेदनी विरोध केला; साधी सूडकथा ते सुपरडुपर हिट फिल्म

Best T20 Batters: टी20 क्रिकेटमधील टॉप 3 फलंदाज कोण? रायडूने निवडले 'हे' 3 खेळाडू, 'किंग' कोहलीला डावललं

DGP Alok Kumar: 'गोव्यात यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत', DGP आलोक कुमार; Video

Illegal Gas Cylinder Refilling: गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड, साळगावात 164 सिलिंडर जप्त; पाचजण ताब्यात

Melvin Noronha: गोमंतकीय डिझायनरचे यश! मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद; टॅन्सी रेणू पालने जिंकले 'राष्ट्रीय वेशभूषे'चे पारितोषिक

SCROLL FOR NEXT