Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: गोध्रा हत्याकांडातील 8 दोषींचा जामीन अर्ज SC कडून मंजूर, 58 कारसेवकांना...

2002 Gujarat Riots: गोध्रा हत्याकांडातील 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची भूमिका लक्षात घेऊन 4 दोषींचा जामीन अर्ज फेटाळला.

Manish Jadhav

2002 Gujarat Riots: गोध्रा हत्याकांडातील 8 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची भूमिका लक्षात घेऊन 4 दोषींचा जामीन अर्ज फेटाळला.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. या 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांची शिक्षा ट्रायल कोर्टाने कायम ठेवली आहे.

या भीषण घटनेत अयोध्येहून येणाऱ्या 58 यात्रेकरुंना जिवंत जाळण्यात आले. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता.

यापूर्वी, न्यायालयाने या लोकांचा अर्ज फेटाळला होता. या सर्व लोकांना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र गुजरात हायकोर्टाने नंतर जन्मठेपेत रुपांतरित केले.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नमूद केले की, या लोकांना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती, जी हायकोर्टाने बदलली होती.

हायकोर्टाच्या याच निर्णयाला गुजरात सरकारने आव्हान दिले होते. एवढेच नाही तर या दोषींच्या जामीन अर्जालाही गुजरात सरकारने विरोध केला होता. दुसरीकडे, दोषींच्या वकिलांनी सांगितले की, हे लोक यापूर्वी 17 वर्षे तुरुंगात होते.

गुजरात सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या लोकांनी गंभीर गुन्हा केला आहे.

मेहता पुढे म्हणाले की, या लोकांनी केलेला गुन्हा जितका जघन्य आहे, तितकाच भयंकर आहे. अशा परिस्थितीत या लोकांना जामीन मिळू नये. या लोकांवर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन त्यांच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येते.

दुसरीकडे, 27 फेब्रुवारी 2022 रोजी गोध्रा रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या काही बोगींना आग लावण्यात आली होती.

या घटनेत अयोध्येहून (Ayodhya) येणाऱ्या 58 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. त्यामुळे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या.

या घटनेतील31 आरोपींना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले असून 63 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एकूण 31 दोषींपैकी 11 जणांना फाशीची शिक्षा आणि उर्वरित 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT