Accident
Accident Dainik Gomantak
देश

गोवा ट्रिपवरून परतताना अपघात; उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

Akshay Nirmale

Kota Family Road Accident: कोटा येथील एमबीएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ चिकित्सक डॉ. राजेश सागर हे आपल्या कुटुंबासह गोव्याहून परतत होते. यादरम्यान त्यांच्या कारला महाराष्ट्रात अपघात झाला. यात त्यांची कार उड्डाणपुलावरून खाली कोसळली. अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.

गोव्याहून राजस्थानात परतताना महाराष्ट्रातील धुळे येथे हा अपघात झाला. यात डॉ. राजेश सागर यांच्या पत्नी मिथलेश यांचा मृत्यू झाला तर डॉ.सागरसह चार जण जखमी झाले.

डॉ. राजेश सागर आणि त्यांचे कुटुंबीय 28 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला गेले होते. गुरुवारी (4 जानेवारी ) रोजी ते गोव्याहून परतत असताना महाराष्ट्रातील धुळे येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला मागून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की त्यांची कार उडून उड्डाणपुलावरून खाली पडली. वाहनात एकूण पाच जण होते. डॉ. राजेश सागर, त्यांची पत्नी मिथलेश यादव, मुलगा राम सागर आणि रामचे दोन मित्रही गोव्याहून कोटा येथे येत होते.

डॉ. राजेश यांच्या पत्नी मिथिलेश यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर डॉ. सागर, त्यांचा मुलगा राम आणि त्यांचे दोन मित्र यांच्यासह चार जण जखमी झाले, त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर कार उड्डाणपुलावरून खाली पडली. त्यामुळे कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला आणि ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. डॉ. सागर आणि त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचा बळी ठरलेले वाहन राम नावाची व्यक्ती चालवत होती. या अपघाताची माहिती कोटा येथे कळल्यावर तिथे एकच खळबळ उडाली. मिथलेश यादव रंगपूर रोड, कोटा येथील गोपाल मील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

मिथलेश या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. गरीब आणि गरजू मुलांना त्यांनी नेहमीच मदत केली. शाळेत वर्गखोल्या बांधल्या, पायऱ्यांवर रेलिंग बसवले, विद्यार्थ्यांना स्वेटर, कॉपी आणि वह्यांचेही वाटप त्यांनी केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honeytrap Case: INS हंसा दाबोळीचे फोटो पाकिस्तानला शेअर केल्याचा संशय, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याची कसून चौकशी

Panaji Murder Case : मालगाडीत झोपले अन् कर्नाटकात पोचले; मराठे खून प्रकरणातील संशयितांचा सिनेस्टाईल प्रवास

Karnataka: 'ते हिंदूंचा द्वेष करतात', काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पोस्ट करणाऱ्या 'मुंबईच्या डॉन'ला गोव्यातून अटक

Goa Today's Live News: सासष्टीत चोऱ्यांमध्ये वाढ! खुल्या पार्कींगमधून स्कुटर चोरीला

Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT