Arvind Kejriwal And Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

पंजाबमधील दणदणीत विजयानंतर 'आप' करणार हिमाचल प्रदेशमध्ये 'एन्ट्री'

"काँग्रेस (Congress) आणि भाजपला कंटाळलेल्या आम आदमीचा आम्हाला पर्याय बनायचं असल्याचं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आम आदमी पार्टी (AAP) ने शनिवारी जाहीर केले की, 'आम्ही या वर्षाच्या अखेरीस शेजारच्या हिमाचल प्रदेशातील सर्व विधानसभा जागा लढवणार आहोत.' "काँग्रेस आणि भाजपला कंटाळलेल्या आम आदमीचा आम्हाला पर्याय बनायचं असल्याचं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी शनिवारी शिमल्यात मोर्चा काढला. आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) पुढील महिन्यात शिमल्यात होणारी नगरपालिका निवडणूकही लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, पंजाबमधील 'आप' चा विजय हा राज्यांमधील पहिला विजय आहे. 2017 मध्येही आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभेची निवडणूक (Punjab Assembly Election) लढवली होती. त्यावेळी काँग्रेसनंतर (Congress) दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी, काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही, तर 117 पैकी केवळ 18 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले होते की, "आप मला एक राष्ट्रीय शक्ती बनताना दिसत आहे."

शिवाय, पंजाब निवडणुकीतील विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, 'आप' हा पक्षापेक्षा अधिक आहे, ही एक क्रांती आहे.' यासोबतच त्यांनी लोकांना पक्षात येण्याचे आवाहन देखील केले होते.

ते पुढे म्हणाले होते की, 'इन्कलाब (Revolution) बदलण्याची वेळ आली आहे. मी तुम्हा सर्वांना 'आप'मध्ये सामील होण्याचे आवाहन करतो. 'आप' हा केवळ पक्ष नाही. एक क्रांती आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. आता इथे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT