उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये एका 23 वर्षीय तरुणाने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम (Facebook Live streaming) करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, लाईव्ह स्ट्रीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून तरुणाची सुटका केली. फेसबुकनेच याबाबत पोलिसांना (UP Police) माहिती दिली. घटना 2022 मार्च महिन्यातील आहे.
फेसबुकची कंपनी मेटा (Meta) आणि उत्तर प्रदेश पोलिस यांच्यात झालेल्या करारामुळे तरुण अभय शुक्लाचा जीव वाचला. फेसबुकने तात्काळ राज्य डीजीपी कार्यालयाच्या मीडिया सेंटरला ईमेलद्वारे याबाबत अलर्ट केले होते.
गाझियाबादचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अंशू जैन यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या माहितीनुसार, " आत्महत्येचा प्रयत्न करणारा व्यक्ती मूळचा उत्तर प्रदेशातील कन्नौजचा आहे आणि त्याचे 90,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते, त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता."
फेसबुककडून अलर्ट मिळताच, गाझियाबाद पोलिसांनी मुलाच्या घराचा शोध घेण्यासाठी धाव घेतली आणि काही वेळानंतर त्यांना गाझियाबादच्या विजयनगर भागात तो सापडला. पोलिसांना हा व्यक्ती त्याच्या खोलीत सापडला आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याला थांबविण्यात आले.
दरम्यान, अशीच एक घटना गेल्या डिसेंबरमध्ये, गुवाहाटी येथे घडली होती. यातएका 27 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह-स्ट्रीम द्वारे कुटुंबाचा दबाव आणि त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी महिलेच्या कुटुंबाला जबाबदार धरले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.