उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 65 वर्षीय तेजपाल अंबालाल (Tejpal Ambalal) रा. मुंबई असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हॉटेलमध्ये अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले तेथून त्यांना तातडीने गुलमर्गमधील प्राथमिक उपचार केंद्रात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (A Tourist From Maharashtra Has Died In Gulmarg In Baramulla District Of North Kashmir)
त्याचवेळी गुलमर्गमधीलच (Gulmarg) आणखी एका घटनेत शनिवारी रात्री उशिरा एका झोपडीला आग लागल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. झोपडीला आग लागली तेव्हा बर्फ पडत होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दल तलावात शिकारा रॅलीचे आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, काश्मीरच्या पर्यटन विभागाने रविवारी खोऱ्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दल सरोवरामध्ये शिकारा रॅलीचे आयोजन केले होते. पर्यटन संचालक जीएन इटू यांनी नेहरु पार्कमधून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. परंतु कोरोनामुळे, शिकारा मध्ये मर्यादित संख्येने लोक सहभागी झाले. शिकारा वाले नेहरु पार्कपासून सुरु झाले असून SKICC मध्ये उत्साहात संपले आणि नंतर उद्यानात परतले.
शिवाय, संचालकांनी सर्व संबंधितांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला. तसेच हाऊसबोट मालकांनी व पर्यटकांनी मास्क घालणे व सुरक्षित अंतर राखणे यावर भर दिला जेणेकरुन पर्यटनाच्या कार्यावर परिणाम होणार नाही. स्वतंत्र भारताच्या मूल्यांची सर्वसामान्यांना ओळख करुन देण्याबरोबरच खोऱ्यातील पर्यटन क्षमता अधोरेखित करणे हा अशा कार्यक्रमांचा उद्देश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.