ED  Dainik Gomantak
देश

Fake ED Officials: ईडी अधिकारी असल्याचे भासवून 164 कोटी वसूल करण्याचा प्रयत्न; आता 6 आरोपी खऱ्या ईडीच्या कचाट्यात

ED Raid: तक्रारदाराने पोलिसांसमोर दावा केला आहे की, तो बनावट ईडी अधिकाऱ्यांपासून घाबरला होता आणि त्याने रोमी भगतला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.

Ashutosh Masgaunde

A total of 6 accused have been arrested by Mumbai Police for trying to extort Rs 164 crore from Omkar Developers as fake ED officials:

स्पेशल-26 चित्रपटाच्या धर्तीवर मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडीचे बनावट अधिकारी म्हणून ओंकार डेव्हलपरकडून 164 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने एकूण 6 आरोपींना अटक केली आहे.

आता खऱ्या खुऱ्या ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, सूत्रांनी सांगितले की, ईडीने या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून माहिती घेतली आहे आणि आता या प्रकरणी ईसीआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले की, या प्रकरणी एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी हिरेन रमेश भगत उर्फ ​​रोमी भगत नावाच्या व्यक्तीला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीत रोमीचे नाव पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने स्वत:ची ईडी अधिकारी म्हणून ओळख करून देत ओंकार डेव्हलपर्सला बोलावून बैठक घेतल्याचा आरोप आहे. या आरोपींनी रायवाल बिल्डर सतीश धानुका यांच्याशी १६४ कोटी रुपये देऊन समझोता करण्यासाठी दबाव टाकला.

तक्रारदाराने पोलिसांसमोर दावा केला आहे की, तो बनावट ईडी अधिकाऱ्यांपासून घाबरला होता आणि त्याने रोमी भगतला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. भगत याला न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्याची कोठडी मागितली आणि सांगितले की, आरोपी ऑस्ट्रेलियात नोंदणीकृत असलेले सिमकार्ड आणि खासगी व्हीपीएनचा वापर करून पीडितांशी संवाद साधत होता आणि त्यांना घाबरवत होता.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी अविनाश दुबे, राजेंद्र शिरसाट, राकेश केडिया आणि कल्पेश भोसले या चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी सेवानिवृत्त कस्टम अधिकाऱ्याचा मुलगा अमेय सावेकर याला अटक केली. यासोबतच रोमी भगत हाही पोलिसांच्या ताब्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

World Introvert Day 2026: अंतर्मुखी लोक हे प्राचीन ग्रीक देवता 'अपोलो'सारखे असतात, जे ‘समजूतदारपणा’ हा गुण प्रकाशित करत असतात..

पुण्याच्या मैदानात 'रॉयल' एन्ट्री! IPL 2026 साठी गहुंजे स्टेडियम सज्ज; 'या' संघाचे सर्व होम मॅचेस पुण्यात रंगणार

Viral Video: सचिन तेंडुलकरची लेक 'सारा'च्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील रस्त्यावरुन फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Goa Politics: ‘क्रॉस व्होटिंग’मध्ये कॉंग्रेसचाच हात! आमदार सिल्वा यांचा आरोप; विजय मिळाला नसला तरी लढत दिल्याचा दावा

SCROLL FOR NEXT